vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ऑपरेशन अभ्यास’ मॉक ड्रिल उद्या 13 मे रोजी नवी मुंबईतील ‘वाशी – सेक्टर 12’ मध्ये

‘ऑपरेशन अभ्यास’ मॉक ड्रिल उद्या 13 मे रोजी नवी मुंबईतील ‘वाशी – सेक्टर 12’ मध्ये

 

            ठाणे, प्रतिनिधी(जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ) :- केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई येथील नीलसिद्धी टॉवर, ए आणि बी विंग, एनएमएमटी टर्मिनस जवळ, प्लॉट नं. 95, सेक्टर 12, वाशी, नवी मुंबई येथे मंगळवार दि.13 मे 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात आले आहे.

 हे मॉक ड्रिल ठाणे जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रांताधिकारी उर्मिला पाटील व शहर अभियंता तथा मुख्य अग्निशमन अधिकारी शिरीष आरदवाड,नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार उमेश पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणार आहे

मॉक ड्रिल मध्ये होणारा घटनाक्रम :-     • सायरन वाजणार. Air Strike/ बॉम्ब हल्ल्याची सूचना मिळणार.• सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना दिल्या जाणार. • धावाधाव, गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले जाईल.• संबंधित परिसरात शोध मोहीम घेऊन जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे,- ही कार्यवाही करण्यात येईल.

  या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी या मॉक ड्रिलला गांभीर्याने घ्यावे. केंद्रीय गृह विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून यशस्वीरित्या ही मॉक ड्रिल पार पाडावी. मॉक ड्रिलच्या दरम्यान सूचना मिळाल्यानंतर दुपारी 4.00 वाजता सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. या दरम्यान नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, सेल्फी काढू नये आणि प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, हे मॉक ड्रिल केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन तहसिलदार उमेश पाटील यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार टंचाईग्रस्त 39 गावे आणि 127 पाड्यांसाठी तातडीने 40 टँकर तैनात, ग्रामीण भागाला मोठा दिलासा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री धन–धान्य कृषी’ योजनेचा शनिवारी शुभारंभ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

🏵️ लिव इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही : अशा जोडप्यांच्या सुरक्षिततेसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय!*

vishwatmaklokswamivarta

जालन्यात 4 मार्चपासून वॉटरशेड यात्रा4 गावामध्ये विविध कार्यम्रम व उपक्रमांचे आयोजन..

150 दिवसीय ई – गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड परिक्षेत्र अव्वल मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा सन्मान 

जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीचा निकाल 100 टक्के