vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली-अनंत कुलकर्णी-हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समिति चे सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी

मुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली-अनंत कुलकर्णी-हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समिति चे सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी

================

जालना/प्रतिनिधी : महापुरुषांच्या जयंतीनिमित्त केवळ डीजे लावून त्यावर नाचणे म्हणजे उत्सव नव्हे, तर त्यांच्या विचारांचे अनुकरण करून नशामुक्त आणि सुसंस्कृत समाज घडवणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन जालना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी केले.

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समितीच्यावतीने लोधी मोहल्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या जन्मोत्सव सोहळ्यात श्री. कुलकर्णी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. समितीचे संस्थापक मार्गदर्शक धनसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.अनंत कुलकर्णी पुढे म्हणाले की, आपण आपला इतिहास वारंवार विसरतो, म्हणून तो पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज पडते. महाराणा प्रतापसिंह यांनी ४०० वर्षांपूर्वी जो संघर्ष केला, तशीच आव्हाने आजही आपल्यासमोर आहेत. आपली स्वतंत्रता आणि संस्कृती अबाधित राखण्यासाठी तरुणांनी सज्ज राहावे. आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे. वडिलांनी आपल्या मुलांसमोर असा आदर्श ठेवावा की ज्यामुळे मुले व्यसनाकडे वळणार नाहीत. नशामुक्त समाजच एक बलशाली राष्ट्र निर्माण करू शकतो. केवळ शारीरिक बल असून चालणार नाही, तर बुद्धी आणि मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी शिक्षणाची कास धरा. समाजात वावरताना महिलांचा आणि मुलींचा सन्मान करणे हा आपल्या संस्कृतीचा पाया असावा. जेव्हा आपला मोहल्ला, गाव आणि जिल्हा सुशिक्षित आणि निर्व्यसनी होईल, तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने बलशाली आणि विकसित होईल.

यावेळी समितीचे संस्थापक धनसिंह सूर्यवंशी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह हे जनमानसाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. तरुणांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून संस्कृती रक्षणासाठी आणि राष्ट्रहितासाठी सदैव पुढाकार घ्यावा.

या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही हा जन्मोत्सव कोणत्याही प्रकारची देणगी न घेता (देणगीविरहित) साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले, यावेळी संपूर्ण लोधी मोहल्ला परिसर महापुरुषांच्या जयघोषाने दणाणून गेला होता.

या सोहळ्याला जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष राजुसिंह राजपूत, व्यापारी महासंघाचे सचिव ॲड. ईश्वर बिल्होरे, हिंदू महासभेचे सुखलालसिंह राजपूत, महाराणा ब्रिगेडचे शहराध्यक्ष कालुसिंह राजपूत, संत रोहिदास स्मारक समितीचे अशोक भगुरे,धरमसिंह वर्मा, दिनेशसिंह राजपूत, अमरसिंह राजपूत, जयपालसिंह राजपूत, नारायण त्रिंबके, देविसिंह राजपूत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री गोलुसिंह वर्मा, मनजीत वर्मा, किशोरसिंह राजपूत, चत्रुसिंह वर्मा, रोहन वर्मा, विवेक वर्मा, अभिजित राजपूत, गणेश गायकवाड़,मनिषसिंह वर्मा, विरुसिंह सुर्यवंशी, युवराज राजपूत, कुणाल सुर्यवंशी, तुषार राजपूत,रणवीरसिंह सुर्यवंशी, गजेंद्र राजपूत, राजासिंह राजपूत, बजरंगसिंह राजपूत, कृष्णा पोडोडे, आकाश देशमाने ,कृष्णा सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले यावेळी शहरातील मोठ्या संख्येने नागरिक व तरुण उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त ‘शोज’ मिळवून देण्यासाठी समिती स्थापन -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मिरज तालुक्यात “सेवा पंधरवडा”अभियानाचा अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते शुभारंभ- “महसूल योजना वाहिनी”स हिरवा झेंडा…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गतजिल्हा उद्योग केंद्राने गाठले कर्ज मंजुरीच्या 325 प्रस्तावाचे उद्दिष्ट..

vishwatmaklokswamivarta

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन बाल भरारी’ एआय अंगणवाडीचा शुभारंभ मिशन बाल भरारी’ उपक्रमातून जिल्ह्यातील 40 बालवाडींचा होणार कायपालट नागपूर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण- जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन

गावातील शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्ते खुले होणार – आजपासून ३१ मार्चपर्यंत जिल्हा महसूल प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम 

vishwatmaklokswamivarta