vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारणस्थानिक बातम्या

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

 सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय फळ महोत्सवात 9 लाख 12 हजार रूपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती पणन अधिकारी ओंकार माने यांनी दिली.

  सांगली जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकरी यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे व मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत फळांवर प्रक्रिया करून त्याची उत्पादने तयार करण्याकरिता शेतकऱ्यांना पणन मंडळामार्फत यापुढेही सहकार्य केले जाईल, असे कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक डॅा. सुभाष घुले यांनी सांगितले. यावेळी कृषी पणन मंडळाचे पणन अधिकारी ओंकार माने, प्रतीक गेनुगडे, अनिल जाधव, सुयोग टकले, संदेश पिसे, सुशांत खाडे उपस्थित होते.

  सांगली फळ महोत्सव 2025 मध्ये सांगली जिल्ह्यातील जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील पिवळे/गुलाबी ड्रॅगनफ्रुट, विटा व वाळवा तालुक्यातील पेरू, चिकू, केळी तसेच आटपाडीचे अंजीर, डाळींब, सीताफळ व विविध फळांची विक्री शेतकऱ्यांमार्फत करण्यात आली. या महोत्सवात एकूण 22 फळ उत्पादक शेतकरी यांनी सहभाग घेतला होता. महोत्सवामध्ये विविध फळांचा देखावा लोकांचे आकर्षण ठरला. जत तालुक्यातील ड्रॅगन उत्पादक शेतकऱ्याने तयार केलेले ड्रॅगनफ्रुटचे आईस्क्रीम पहिल्यांदाच सांगली शहरवासीयांना चाखायला मिळाली. तसेच मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत व्यंकटेश ॲग्रो यांनी तयार केलेली जांभूळ, लिंबू, पपई व स्ट्रॉबेरी पासूनची उत्पादने महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध होती.

 पणन मंडळाकडून आयोजित केलेल्या या महोत्सवात सहभागी झालेल्या संभाजी कोडग, विजय मोरे, प्रविण कुंभार इत्यादी शेतकऱ्यांनी पणन विभागाचे आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आभार मानले व पुढेही असेच महोत्सव आयोजित करण्याबाबत विनंती केली.

00000

संबंधित पोस्ट

अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत फेरीवाले, होर्डींग – बॅनर्स, वाहने यावर सातत्यपूर्ण धडक कारवाया

vishwatmaklokswamivarta

*हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे* *-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन*

अहमदपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – सहकारमंत्री बाबासाहेब पाटील* अग्निशमन अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण* शहराच्या वैभवात भर घालणारे व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन* न्यायालय इमारत आणि भूमिगत गटार योजनेसाठी पाठपुरावा

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ हजार ४५९ पोलिसांना मिळणार हक्काचे घर राज्यातील पोलीस अंमलदारांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार दोन वर्षांपासून प्रलंबित डीजी लोनला १७६८ कोटींची मंजुरी,आ. श्री. मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे,१६५२ वाड्यांमध्ये ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta