vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

*हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे* *-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन*

*हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे* *-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन*

सातारा, प्रतिनिधी : *हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमा निमित्त नवी मुंबई येथील खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी भव्य कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.*

देशाच्या एकात्मतेसाठी अनेक संतांनी खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्राला संतांच्या प्रबोधनाचा समृध्द व गौरवशाली वारसा लाभला आहे. संत परंपरेने राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक एकात्मतेला भक्कम अधिष्ठान दिले आहे.

 हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्यागाचे व कार्याचे स्मरण होण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने नवी मुंबई येथे ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असा श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा शहीदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शीख सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव या समुदायाचे नागरिक सहभागी होणार असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होवून राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना बळ देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार,माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, त्या आरोपावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे काय म्हणाले ते पहा…या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी केली आणि….

vishwatmaklokswamivarta

वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

राष्ट्रीय मतदार दिन शनिवारी(दि.२५);विविध कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महानगरासह ग्रामीण भागाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्यक्रम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरच्या कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात

vishwatmaklokswamivarta

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली घाटांची कामे विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करा- कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta