vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत फेरीवाले, होर्डींग – बॅनर्स, वाहने यावर सातत्यपूर्ण धडक कारवाया

अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत फेरीवाले, होर्डींग – बॅनर्स, वाहने यावर सातत्यपूर्ण धडक कारवाया

        नवी मुंबई प्रतिनिधी  दिवाळी कालावधीत तात्पुरत्या फेरीवाल्यांची वाढलेली संख्या यामुळे रस्ते, पदपथ, गल्ल्या यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचs वाढलेले प्रमाण आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास निदर्शनास आला होता. तसेच या उत्सवाच्या कालावधीत विविध वस्तू खरेदीचे प्रमाण वाढल्याने दुचाकी व इतर वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरली होती, परिणामी वाहतुकीच्या समस्या उभ्या राहिल्या होत्य

 अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त ( अतिक्रमण ) डॉ. कैलास गायकवाड यांचे प्रत्यक्ष नियंत्रणाखाली, नवी मुंबईतील आठही विभाग कार्यालयांमार्फत मागील आठवडाभर अनधिकृत फेरीवाले, पदपथावरील अतिक्रमण, अनधिकृतपणे रस्त्याच्या बाजूला उभी केलेली वाहने व होर्डींग / बॅनर्स यांच्यावर धडक कारवायांची विशेष मोहीम सातत्यपूर्ण रितीने राबविण्यात आली.

या विशेष मोहीमेत अनधिकृतपणे समासी जागेचा वापर करणाऱ्या 330 दुकानांवर कारवाई करण्यात आली. 8488 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. रस्त्यावर / नो-पार्किंग क्षेत्रात अनधिकृतपणे उभ्या असलेल्या 14 वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या 1176 होर्डिंग/ बॅनर्सवर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहीमेमध्ये रू. 7,45,050रक्कमेचे दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले.

 रस्ते व पदपथ अडथळेमुक्त असावेत तसेच रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त असावा या नमुंमपा आयुक्त महोदयांच्या धोरणानुसार बेलापूर, नेरुळ, सिवूड्स, कोपरखैरणे या स्टेशन परिसरात तिन्ही पाळ्यांमध्ये फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यासोबतच महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते तथा अंतर्गत रस्त्यांवरील अनधिकृत स्टॉल्स, मंडप, वाहने व झोपड्या मोठ्या प्रमाणात निष्कासित करण्यात आल्या आहेत.

शहरातील वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकरिता महानगरपालिकेची विभाग कार्यालये व वाहतुक पोलीस उपआयुक्त यांचे समन्वयाने पार्कींग स्थळे, पार्कींग व नो – पार्कींग झोन निश्चितीकरण याकरिता वाहतुक पोलीस, महानगरपालिकेचे विभागीय कार्यकारी अभियंता तसेच मालमत्ता विभाग, अतिक्रमण विभाग यांची उच्चस्तरीय बैठक 31 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेली आहे

   स्वच्छ व सुंदर शहर असा लौकिक असणा-या नवी मुंबई शहरातील रस्ते व पदपथ अडथळामुक्त ठेवले जावेत यादृष्टीने यापुढील काळात महानगरपालिकेमार्फत सातत्यपूर्ण मोहिमा राबविल्या जातील व अनधिकृत बॅनर्स , पोस्टर्स व होर्डींग उभारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे निर्देश महापालिका आयुक्त यांचेमार्फत सर्व सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.

0000

संबंधित पोस्ट

ठाणे येथे उपमुख्यमंत्र्यांकडून एसटीच्या स्मार्ट बसची पाहणी सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक ‘टेक वारी’चा ऑनलाईन शुभारंभ

विधान परिषद प्रश्नोत्तरे-कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत एसएससी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष बसगाड्यांची व्यवस्था..