vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य प्रतिनिधी -राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी लहान वयातच जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलं आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन उभारण्यात येणार असून ते सुमारे एक एकर क्षेत्रात विकसित केले जाणार आहे. प्रत्येक उद्यानासाठी अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या गार्डन्समध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत.

ही उद्याने विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असतील. वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ट्रायल ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

उद्यानांमध्ये दुर्मिळ वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जाणार आहे. तसेच भविष्यामध्ये ई-वाहनांच्या प्रतिकृती आणि माहिती नागरिकांना पाहता येणार आहे. वाहतूक शिस्तीसोबतच पर्यावरण जनजागृतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं.

00000

संबंधित पोस्ट

अमृततर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा-2026पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य…

निराधार वृद्ध आजी आजोबांना वृद्धाश्रमाचा आधार-वृद्धाच्या मदतीला धावून आले सामाजिक कार्यकर्ते…

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल आज उरणमध्ये**नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे*

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘जिवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम; बंद्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप २०२६ साठी कृषी विभागाचे आवाहन