vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना छत्री वाटप

सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना छत्री वाटप

ठाणे – प्रतिनिधी –

कायम शिवसैनिकांचा मायेने विचार करणाऱ्या, खंबीरपणे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना आज छत्री वाटप करण्यात आले.

आनंदआश्रम येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ठाण्याच्या महापौर सौ. शर्मिला पिंपळोलकर, ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पवन कदम, मेअर फार्माचे संचालक राजेश तावडे, उमा कालेकर, बाळा गावस, किरण नाकती, धर्मवीर दिव्यांग सेनेचे शरद पवार, गिरीश मेहरोल उपस्थित होते. ठाणे शहर आणि परिसरातील दिव्यांग बांधव आणि भगिनी यावेळी उपस्थित होत्या.

लता वहिनी या नेहमीच शिवसैनिकांची मायेने विचारपूस करतात, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात, प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांच्या मनात लता वाहिनी यांचे विशेष स्थान आहे. शिंदे साहेबांच्या प्रत्येक सामाजिक आणि लोकहिताच्या कार्यात त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मोफत छत्री वाटप करून समाजोपयोगी उपक्रम राबविल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

000000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी यांनी घेतला जिल्ह्यातील महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू

कुचीत विकसित कृषि संकल्प अभियान उत्साहात संपन्न

पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रकार रघु राय यांना श्रद्धांजली छायापत्रकारितेच्या क्षेत्रातील मनस्वी व्यक्तिमत्वाला मुकलो

आंतराष्ट्रीय योग दिन,आबालवृद्धांचा योग सरावात उत्स्फूर्त सहभाग बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामूहिक योगासन.