vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट,शासनाच्या वतीने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली

भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट,शासनाच्या वतीने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली

राज्य प्रतिनिधी-भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी यावेळी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच प्रभावीपणे #बचावकार्य राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली असून त्यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी #मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या वतीने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आपत्तीग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही देत मंत्री श्री. महाजन यांनी दुर्घटनेतील मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

रत्नागिरी  मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

सायन येथील “गुरुकृपा ” रेस्टॉरंटचा 50 वा वर्धापनदिन साजरा

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध,पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

म्हाडा प्रमाणे एसआरएमध्येदेखील स्वयंपुनर्विकास योजना- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

*6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू*

vishwatmaklokswamivarta

जागतिक कर्करोग दिनी आयोजित विशेष कर्करोग तपासणी मोहीमेचा 267 नवी मुंबईकरांनी घेतला लाभ…

vishwatmaklokswamivarta