vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागरी सेवा देतांना येणार्‍या तांत्रिक अडचणी दूर करा – अश्विन अंबेकर

नागरी सेवा देतांना येणार्‍या तांत्रिक अडचणी दूर करा – अश्विन अंबेकर

 जालना,प्रतिनिधा) -नागरी सेवा हक्क दिन साजरा करण्याचा शासनाचा उद्देश हा नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध पद्धतीने योग्य सेवादेणे हा आहे पण प्रत्यक्षात मात्र शासनाच्या वतीने नागरिकांसाठी ऑनलाईन,पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या साईट या वेगाने काम करत नाहीत तर संथगतीने होणार्‍या कामामुळे योग्य त्या वेळेत नागरिकांना सेवा मिळत नाहीत त्यामुळे या सेवांमध्ये असणार्‍या तांत्रिक अडचणी प्रथम दूर कराव्यात अशी बाब नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली

जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार २८ एप्रिल रोजी नागरी सेवाहक्क दिन साजरा करण्याच्या नियोजना संदर्भात महापालिकेच्या वतीनेमहानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांची बैठक महापौर वंदना मगरे यांच्याअध्यक्षतेखाली व उपमहापौर राजेश राऊत, सभापती अशोकराव पांगारकर, आयुक्तअंजली शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयीसभागृहात संपन्न झाली. यावेळी पुढे बोलताना नगरसेवक अश्विन अंबेकर म्हणाले की, त्यामुळे नागरी सेवा हक्क दिन साजरा करताना या सरकारीसेवांमध्ये येणार्‍या त्रुटी दूर केल्या तरच सामान्य नागरिकांना चांगल्यासेवा मिळतील. नागरिकांना अत्यंत संथ गतीने चालणार्‍या साईटमुळे,जन्म-मृत्यु प्रमाणपत्र, बांधकाम परवाने, विविध करांचा भरणा केल्याच्या,पावत्या यासह आदी कामांसाठी महानगरपालिकेत अनेक चकरा माराव्या लागतात.त्या थांबल्या पाहिजेत असे नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर म्हणाले. या बैठकीस विरोधी पक्षनेते कमलेश खरे, गटनेते, दीपक राठोड, नगरसेविका दर्शनाखोतकर, निखिल पगारे, दुर्गेश कठोठीवाले, अशोक पांगरकर, विजय जाधव, दिनेश भगत, अमोल ठाकूर, संजय डुकरे, योगेश भगत यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवक व अधिकार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका चे ५० टक्क्यांची सवलत देणाऱ्या अभय योजनेचा लाभ घेण्याची शेवटची संधी 💯✨

महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ; दरवाढ  लागू..

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना-नवी मुंबई  क्षेत्रातील आणि कामोठे व खारघर नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील तसेच शुक्रवार दि. 07 मार्च 2025 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी साताऱ्यात चरणसेवा पथके सज्ज; एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

टॉप क्लास स्कूल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना; 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले