vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कृषी केंद्रांनी 10 ऑगस्टपूर्वी ई-पॉसबसवावे*साठ्यामधील तफावतीमुळे कृषी निविष्ठा केंद्रावर कारवाई

कृषी केंद्रांनी 10 ऑगस्टपूर्वी ई-पॉसबसवावे*साठ्यामधील तफावतीमुळे कृषी निविष्ठा केंद्रावर कारवाई

     अमरावती, प्रतिनिधी: अनुदानित खत विक्री करण्यासाठी कृषि विभागाकडून विक्रेत्यांना आधुनिक ई-पॉसच्या 29 हजार यंत्रांचे वितरण करण्यात आले आहे. अद्यापही एक हजार विक्रेत्यांनी ही यंत्रे घेतलेली नाहीत. त्यांनी 10 ऑगस्टपूर्वी ई-पॉस मशिन बसवावे, अन्यथा दंडात्मक, परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

   जिल्ह्यामध्ये किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस यंत्राच्या माध्यमातून करणे बंधनकारक केले आहे. खत विक्रीच्या नोंदी तात्काळ आणि अचूक पद्धतीने समाविष्ट करण्यासाठी ई-पॉसमधील साठा आणि प्रत्यक्ष साठा समान असणे गरजेचे आहे. यासाठी विक्रीची नोंद आयएफएमएस प्रणालीमध्ये घेणे बंधनकारक आहे. नियमित तपासणी करण्यासाठी क्षेत्रियस्तरावरील तालुका खत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. खत विक्रेत्यांकडे ई-पॉसवरील खतसाठा व प्रत्यक्ष साठा यामध्ये फरक असल्यास खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये ई-पॉस मधील रासायनिक खतामध्ये तफावत आढळुन आलेल्या 6 कृषी निविष्ठा केंद्राच्या परवान्यावर निलंबन आणि 2 कृषी निविष्ठा केंद्राच्या परवान्यावर रद्दची कारवाई करण्यात आली आहे.

    जिल्ह्यामध्ये विक्रेत्यांनी एल 1 सिक्युरिटी हे नवीन यंत्र अद्यापही घेतलेले नाहीत, अशांनी जिल्ह्यातील कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क करून 10 ऑगस्टपूर्वी यंत्र सुरू करावेत, असे आवाहन कृषि उपसंचालक यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात कृषि दिनानिमित्त 15 लाख वृक्षारोपण,संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे   – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करा

किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन कामाला गती द्यावी* – *पालकमंत्री शंभूराज देसाई* 

कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. 

vishwatmaklokswamivarta

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गंत शेतबांधावर नैसर्गिक निविष्ठा निर्मिती या घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन