vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गंत शेतबांधावर नैसर्गिक निविष्ठा निर्मिती या घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गंत शेतबांधावर नैसर्गिक निविष्ठा निर्मिती या घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नोंदणीकृत शेतकरी गट आणि महिला बचत गटांना संधी

 

नांदेड प्रतिनिधी:- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा -2 अंतर्गत प्रकल्प गावांमध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान अंतर्गत “शेतबांधावर नैसर्गिक निविष्ठा निर्मिती या घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा- 2 अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान सुरू केले आहे. या अभियानामुळे शेतीचे उत्पादन खर्च कमी करणे आणि बदलत्या हवामानात शाश्वत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे हा उद्देश आहे. त्यानुषंगाने प्रकल्प गावांमधील शेतकऱ्यांसाठी “शेतबंधावर नैसर्गिक निविष्ठा करणे ही बाब राबविण्या साठी शेतक-यांनी सदर घटकांसाठी अर्ज करावेत.

लाभार्थी निकष: सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प गावातील आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, इतर यंत्रणांमर्फत/ संस्थामार्फत नोंदणीकृत महिला बचत गट ( एम एस आर एल एम, माविम , पानी फाऊंडेशन, नाबार्ड, बाएफ इ.) पात्र राहतील.

शेतीशाळेमध्ये सहभागी झालेले शेतकरी गट, फार्मर कप मध्ये सहभागी झालेले शेतकरी गट यांना प्राधान्य. लाभार्थी गटाची अर्ज प्रक्रिया प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in पोर्टल द्वारे होणार असल्याने लाभार्थी गटाने सदर घटकसाठी अर्ज करताना गट नोंदणी प्रमाण पत्र, संबंधित गटाचा ठराव तसेच गटाच्या वतीने अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील प्राधिकार पत्र सोबत जोडणे बंधनकारक राहील.

अर्जदार गटाने संबंधित गावातील ग्राम कृषि विकास समितीची शिफारस घेणे बंधन कारक राहील.

अर्थसहाय्य: नैसर्गिक निविष्ठा उत्पादन यूनिट या घटकासाठी प्रकल्प किमतीच्या 60 टक्के अनुदान (कमाल रु. 75000/-) अंमलबजावणी पश्च्यात देय राहील.

सदर घटकांतर्गत अनुज्ञेय बाबींकरीता केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रचलित योजनांतर्गत अनुज्ञेय असलेले सर्व मापदंड (Cost Norm) लागू राहतील.नैसर्गिक निविष्ठा तपशील: प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खालीलप्रमाणे नैसर्गिक निविष्ठा उत्पादनासाठी अनुदान अनुज्ञेय राहील.

जमिनीच्या पोषणासाठी नैसर्गिक निविष्ठा: 1) जिवामृत 2) घनामृत पीक संरक्षणासाठी नैसर्गिक निविष्ठा: 3) जिवामृत 4) निंबोळी अर्क 5) दशपर्णी अर्क 6) ब्रम्हास्त्र 7) निमास्त्र 8) अग्निस्त्र

अधिक माहितीसाठी प्रकल्प अंतर्गत आपल्या गावच्या समूह सहाय्यक, सहाय्यक कृषि अधिकारी, उपकृषी अधिकारी. मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा तसेच प्रत्येक गावातील जास्तीत जास्त नोंदणीकृत शेतकरी गट, महिला बचत गट यांनी सदर नैसर्गिक निविष्ठा उत्पादन युनिट या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण 9 हजार 650 प्रकरणे निकाली60 कोटी 42 लाख 83 हजार 637 रुपयाची तडजोड रक्कम वसूल..

vishwatmaklokswamivarta

रामतिर्थ स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करा!इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाची मागणी

vishwatmaklokswamivarta

डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन

अंबादास दानवे यांनी आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी अशोक काकडे- एकूण 291 मतदान केंद्रांवर होणार मतदान, मतदारसंख्या अडीच लाखाहून अधिक 

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलाचे वाचवले प्राण.

vishwatmaklokswamivarta