vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

जनसंवाद’ कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी स्वीकारली १ हजारावर निवेदने आस्थेने चौकशी करून विविध प्रश्न वेळेत मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

जनसंवाद’ कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी स्वीकारली १ हजारावर निवेदने

आस्थेने चौकशी करून विविध प्रश्न वेळेत मार्गी लावण्याचे दिले आश्वासन..

अमरावती, प्रतिनिधी: शेती व अन्य कामांसाठी रेती, माती वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची अडवणूक करू नये, जिल्हा प्रशासनातील सर्व कार्यालयांनी आठवड्यात दुपारी ३ ते ५ दरम्यान वेळ निश्चित करून अभ्यागतांना भेटा व त्यांचे प्रश्न सोडवा अशा सूचना देत पत्रकारांना निवासासाठी एकाच ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देत महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात जवळपास १ हजारांहून अधिक निवेदने स्वीकारली.

नियोजन भवनात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तरुण, तरुणीपासून महिला, पुरुष, वरिष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींनी यावेळी श्री. बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सोपविले. या सर्व नागरिकांची त्यांनी आस्थेने चौकशी करून संबंधित विभागाकडून वेळेत अडचणी दूर करण्याचा विश्वास दिला.

जमीन मोजणी, जमिनीचा ताबा मिळूनही मालकी हक्क मिळालेला नाही, मुख्य रस्त्याशेजारील नाले दुरुस्ती, योजनेचा लाभ अशा विविध विषयांवर यावेळी निवेदने देण्यात आली. ही सर्व निवेदने संबंधित विभागाकडून तातडीने निकाली काढणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिला.नियोजन भवनासमोर उपस्थित दिव्यांग व्यक्तींची आस्थेने चौकशी करून त्यांचे प्रश्न समजून घेत अडचणी दूर करण्याचा विश्वास दिला.

जनसंवाद कार्यक्रमाला आमदार सर्वश्री प्रवीण तायडे, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रतापदादा अडसड, प्रवीण पोटे, उमेश यावलकर, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले आदी उपस्थित होते.

 

०००००

संबंधित पोस्ट

प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेजिल्हा रोजगार मेळाव्यात नियुक्ती आदेश वितरण..

विकसित नागपूर-२०४७’ आराखड्याची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी होईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मित्रा’ संस्थेच्या वतीने नागपूर विभाग शाश्वत विकासाच्या रणनीतीवर आधारित कार्यशाळेचा समारोप

vishwatmaklokswamivarta

जीबीएस आजाराच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे- पालकमंत्री शंभूराज देसाई,पाण्याचे नमुने सातत्याने तपासावेत नागरिकांनी दुषीत अन्न व पाणी टाळाव लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा…

vishwatmaklokswamivarta

मनोज जरांगे पाटील यांच्यावर मध्यरात्री सलाईनद्वारे उपचार; प्रकृती स्थिर – जिल्हा प्रशासनाची माहिती

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राजभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा राजस्थान व ओडिशाचे राज्याच्या विकासात देखील मोठे योगदान..’पधारो म्हारो देस : राज्यपालांकडून रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील  विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप

हैदराबाद विमानतळावर सीआयएसएफची मोठी कारवाई …अबू धाबीहून आलेल्या दोन प्रवाशांकडून ₹1.4 कोटी किमतीच्या अघोषित इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त — ड्रोन, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक वस्तूंचा समावेश.

vishwatmaklokswamivarta