vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मनोज जरांगे पाटील यांच्यावर मध्यरात्री सलाईनद्वारे उपचार; प्रकृती स्थिर – जिल्हा प्रशासनाची माहिती

मनोज जरांगे पाटील यांच्यावर मध्यरात्री सलाईनद्वारे उपचार;  प्रकृती स्थिर – जिल्हा प्रशासनाची माहिती

जालना, प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मागील दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची सोमवारी मध्यरात्री जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली व सलाईन लावून उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे

सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाच्या विशेष पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. उपोषणामुळे श्री. जरांगे पाटील यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब कमी झाल्याचे तसेच त्यांचे वजन घटल्याचे तपासणीत आढळून आले.

श्री. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड तसेच जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाने त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून श्री. जरांगे पाटील यांना सलाईन घेण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करत श्री. जरांगे पाटील यांनी सलाईनद्वारे उपचार घेण्यास संमती दिली. त्यानंतर त्यांना मध्यरात्री चार व आज दिवसभरात दोन सलाईन लावण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

00000

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांनी पुस्तकांची साथ कधीही  सोडू नय- सचिव गि. ग. कांबळे. – कायदेविषयक शिबीर, जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित मोर्चात बौध्दांनी ताकद दाखवावी -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

एच आय व्ही संसर्गित रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे,जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीत निर्देश

दक्षता जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन- पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार- दि. 27 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2025 कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह

vishwatmaklokswamivarta

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमली पदार्थ संबंधी गुन्ह्यांत झिरो टॉलरन्स महत्वाचे

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारासाठी आता संकेतस्थळावर अर्ज करावेत