vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांनी पुस्तकांची साथ कधीही  सोडू नय- सचिव गि. ग. कांबळे. – कायदेविषयक शिबीर, जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी पुस्तकांची साथ कधीही  सोडू नय- सचिव गि. ग. कांबळे.

– कायदेविषयक शिबीर, जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

            सांगली, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी पुस्तकांची साथ कधीही सोडू नये. ज्ञानी व्यक्तीच्या आयुष्याचा आलेख हा कायम चढता राहतो. त्यामुळे चांगली संगत धरणे, शिक्षकांचे व आई वडिलांचे नाव मोठे करणे हे विद्यार्थ्यांचे प्रथम ध्येय असायला हवे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी केले.

     कायदेविषयक जनजागृतीसाठी आयोजित रॅलीनंतर शे. र. वि. गो. सर्वोदय विद्यालय सांगली येथे आयोजित कायदेविषयक शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अशासकीय सदस्य विजय कोगनोळे, मुख्याध्यापिका श्रीमती एस. जी. म्हेतर, सहशिक्षक संजय पवार आदि उपस्थित होते.   यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी बालकांचे कायदे, बालमजुरी, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून व व्यसन करणाऱ्या लोकांपासून लांब रहावे, जेणेकरून आपले आरोग्य व मानसिक स्थिती चांगली कशी करता येईल, याचे उदाहरण त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात आलेल्या अनुभवातून दिलेसचिव गि. ग. कांबळे यांनी सर्वोदय विद्यालय, सांगली येथे रॅलीस हिरवा झेंडा दाखवल्यानंतर तिथून ही रॅली रेल्वे स्टेशन सांगली, कुपवाड रोड हळद कारखाना या मार्गे पुन्हा सर्वोदय हायस्कूल सांगली येथे येऊन रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये विद्यालयातील एकूण 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. रॅलीचा उद्देश कायदेविषयक जनजागृती जनसामान्यापर्यंत पोहोचवणे हा होता. या रॅलीमध्ये कायदेविषयक जनजागृतीचे नारे व घोषणा देण्यात आल्या.

    स्वागत मुख्याध्यापिका श्रीमती एस. जी. म्हेतर यांनी केले. प्रास्ताविक संजय पवार यांनी केले. कार्यकमाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक, शंकरराव वानखडे, संतोष खंदारे, नितीन आंबेकर व इतर कर्मचारी तसेच सर्वोदय विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी केले.

00000

संबंधित पोस्ट

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना निर्धार*

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणात कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही उपवर्गीकरणाबाबत हरकतींची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट

उपमुख्यमंत्री कार्यालय  जनसंपर्क कक्ष )१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष फिल्डवर उतरून उपाययोजना करावी आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हीसीद्वारे बैठक

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया : कागदपत्र पडताळणी व प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वामी विवेकानंद विद्यालयाचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित- शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण