vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, प्रतिनिधी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांना खूप उपयोगी आहे. या योजनेची व्याप्ती राज्यात वाढवणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरणातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे याचा शुभारंभ दरे तालुका महाबळेश्वर येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवन संरक्षक अमोल सातपुते, वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, सातारचे प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.उन्हाळ्यामध्ये धरणाची पाणी पातळी कमी होते. पाणी पातळी कमी झाल्यामुळे धरणातील गाळ काढल्यानंतर पाण्याची क्षमता ही वाढते व गाळाचा उपयोग शेतीमध्ये केला जातो. यामुळे शेती अधिक सुपीक व कृषी उत्पन्न जास्त देते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसह धरण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी फार महत्त्वाची आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धरणांमधील व तलावांमधील गाळ काढून तो आपल्या शेतात टाकावा व आपली शेत जमीन जमीन सुपीक करून कृषी उत्पन्न वाढवावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

०००

संबंधित पोस्ट

पोश’ कायदा व महिला सुरक्षा कायद्यांची कडक अंमलबजावणी करा; राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रशासनाला निर्देश> • सुकन्या समृद्धी, मनोधैर्य आणि ड्रोन दीदी योजनेला गती देण्याच्या सूचन • १० पेक्षा जास्त संख्या असणाऱ्या ठिकाणी तातडीने ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करा

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये उद्या स्वच्छता मोहीम‘महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता होणार

vishwatmaklokswamivarta

आरोग्यविषयक सर्वेक्षणाची माहिती-देवून सहकार्य करण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न; अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचा संदेश…

vishwatmaklokswamivarta