vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेशस्थानिक बातम्या

आरोग्यविषयक सर्वेक्षणाची माहिती-देवून सहकार्य करण्याचे आवाहन.

आरोग्यविषयक सर्वेक्षणाची माहिती-देवून सहकार्य करण्याचे आवाहन.

 

        सांगली, प्रतिनिधी : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर “कुटुंबांचा आरोग्य विषयक होणारा खर्च” या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये फेब्रुवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. तरी सर्वेक्षणाकरिता घरी येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना परिपूर्ण माहिती देऊन सर्व संबंधित कुटुंबियांनी सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे आयुक्त व संचालक तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक अ. भ. पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.    निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील 365 दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. उपरोक्त पाहणीचे निष्कर्ष आरोग्यसेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.   ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालय / दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब आणि मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती यामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचा उपयोग आरोग्यसेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

  त्या अनुषंगाने माहिती संकलित करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना सखोल प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे दि. 7 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी फेब्रुवारी ते डिसेंबर 2025 दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती गोळा करतील.

 नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरिता घरी येणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून कुटुंब निवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबियांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकान्वये करण्यात आले आहे.00000

संबंधित पोस्ट

मुंबई किनारी रस्त्याची उत्तर वाहिनी सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत—किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावरील विशेष कार्यशाळा

श्रीराम नवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात वाहतूक नियमन..

vishwatmaklokswamivarta

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी अणवाणी, दुचाकीवरुन गाठला शेतकऱ्यांचा बांध**परिस्थितीचा आढावा घेऊन दिला धीर*

vishwatmaklokswamivarta

पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

vishwatmaklokswamivarta