vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणाराशैक्षणिक खर्च मिळणार शासकीय योजनेतून …

निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणाराशैक्षणिक खर्च मिळणार शासकीय योजनेतून …

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- केंद्र शासनाच्या Top Class Education in School for OBC,EBC & DNT Students”under PM YASASVI- reg EG. या योजनेकरिता ईबीसी ,डीएनटी प्रवार्गार्तील इयत्ता 9 वी ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थांनी https://scholarships.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च शासकीय योजनेतून मिळणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड सुनिल जाधव यांनी दिली आहे.

     याकरिता पात्रता :- लाभार्थी: ओबीसी, ईबीसी, डीएनट्टी प्रवर्गातील विद्यार्थी, वार्षिक कुटुंबीय उत्पन्नः कमाल 2 लाख  50 हजार असावे , निवड

पद्धतः मागील वर्गातील गुणांच्या आधारे मेरिट यादी, आरक्षण: किमान 30% जागा मुलींसाठी राखीव शाळा निवडः सलग वर्षांमध्ये 100 % निकाल देणाऱ्या रायगड,जिल्ह्यातील सर्वोत्तम शाळांचीनिवडकेलीली यादी  मिळविण्यासाठी   सोबतचा QR code स्कॅन करून घेणे.

      वर्गनिहाय  आर्थिक मदत- इयत्ता 9 वी-10 वी, वार्षिक मदत 75 हजार, समाविष्ट घटक शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा फी, पुस्तके, गणवेश, विशेष बाबी 8 वी 9 वीच्या गुणांवर आधारित मेरिट यादी.  इयत्ता 11 वी-12 वी, वार्षिक मदत 1 लाख 25 हजार, समाविष्ट घटक शुल्क, वसतिगृह शुल्क, प्रयोगशाळाशुल्क, कोचिंग फी, विशेष बाबी 10 वी 11 वीच्या गुणांवर आधारित मेरिट यादी.

      अर्ज प्रक्रिया :- 1. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे,  2. शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करेल, 3.राज्य सरकारकडून अंतिम मंजूरी,4. मुलगे व मुलींसाठी स्वतंत्र मेरिट यादी तयार,5. शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार.

    अटी व निरीक्षण :- 1.आधार लिंक केलेली उपस्थिती प्रणाली आवश्यक,2.नियमित उपस्थिती व समाधानकारक शैक्षणिक प्रगती आवश्यक,   3. इतर शासकीय योजनेंतर्गत एकाच उद्देशासाठी दुहेरी लाभ घेता येणार नाही

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.8 ते 21 एप्रिल 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले

राज्याच्या नवीन कौशल्य धोरण मसुद्यावर हरकती व सूचनांचे आवाहन;6 मार्चपर्यंत मुदत

खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका – आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

vishwatmaklokswamivarta

औद्योगिक कंपन्यांमधून मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या रोजगार संधींचा लाभ घेण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घ्यायला हवा – धनंजय साजेकर रोजगार मेळाव्यात १२० उमेवारांची नावनोंदणी