vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु

सातारा प्रतिनिधी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत खटाव व दहिवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुकांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल यांनी केले आहे.

 वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. वसतिगृह कार्यालयातून विहीत नमुन्यातील वसतिगृह प्रवेशाचे अर्ज प्राप्त करून घेवून ते हायस्कूल विभागागात 30 जून पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह (मागिल वर्षाचे गुणपत्रक, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, दिव्यांग असल्यास दिव्यांग दाखला व अनाथ असल्यास अनाथाचा दाखला इ.) वसतिगृह कार्यालयात सादर करावेत. वसतिगृहात इयत्ता ८ वी. पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व ज्यांचे वार्षिक उत्पन्न रू. २.५० लाख पेक्षा कमी आहे अशा अनु. जाती संवर्गातील विद्यार्थाना गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो.

  वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत निवास, भोजन, नाष्टा, दुध, फळे, अंडी, अंथरूण-पांघरूण, शैक्षणिक स्टेशनरी, वह्या व पुस्तके मोफत पुरविली जातात. तसेच प्रवेशितांना दरमहा रू. ५००/- निर्वाहभत्ता दिला जातो. विद्यालय विभागाच्या सर्व व ज्या कॉलेजमध्ये गणवेश सक्तीचा आहे त्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रोख रक्कम दिली जाते. शैक्षणिक सहल खर्च व जर्नल खरेदीची रक्कम देखील दिली जाते.

0000

संबंधित पोस्ट

शारीरिक, मानसिकदृष्ट्या भक्कम राहण्यासाठी योग साधना आवश्यक – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वविक्रमी भक्तियोग

विविध मागण्यांसाठी दिव्यांगांची कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने

मातीच्या पणत्यांतून उजळतेय भविष्याचे आकाश;बालगृहातील मुलांना मिळाला नवा आत्मविश्वास!- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना- बालगृहातील मुलांना कौशल्य विकासाचे धडे – 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सांगली शहरातील सत्ता प्रकार रुपांतरीत मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण…

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यपालांकडून परळ येथील शाळेतील स्मार्ट वर्गखोली, स्वच्छता सुविधांची पाहणी स्मार्ट क्लासरूम सोबत स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक सामाजिक दायित्व निधीतून केलेले वर्गखोल्यांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta