vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हरित सातारा उपक्रम दरवर्षी राबवणार*   *- सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले*

*हरित सातारा उपक्रम दरवर्षी राबवणार*   *- सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले*

सातारा प्रतिनिधी: सातारा जिल्हा निसर्गाने व झाडा झुडपांनी नटलेला आहे. यात आणखीन भर पडावी यासाठी हरित सातारा उपक्रम प्रत्येक वर्षी 1 जून रोजी राबवणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगरपरीषदेच्या संयुक्त विद्यमाने पोलिस परेड मैदान येथे वृक्ष लागवड अभियानास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, सिने अभिनेते संयाजी शिंदे, दिशा कमिटीच्या सदस्या रेणूताई येळगावकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील व नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

अनेक डोंगरावरील झाडांची संख्या कमी झालेली आहे. प्रशासनाने स्थानिकांच्या सहकार्याने या डोंगरावर पुन्हा वृक्षारोपन करावे. दर वर्षी झाडे किती लावली, किती जगली याचा आढावा घेऊन जीओ टँगींगद्वारे माहिती शासनाला सादर करणार, असल्याचेही सार्वजनिक बांधकाम श्री. भोसले यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, रस्त्यांच्या रुंदीकरण कामामुळे झाडे काढावी लागतात. ज्या ठिकाणची झाडे काढली आहेत त्या ठिकाणी पुन्हा देशी झाडांचे वृक्षारोपन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभियानात ८ ते १० फूट उंचीची विविध प्रकारची २ हजार ८०० झाडे लावण्यात येणार असून या अभियानात सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे ११० कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेल्हे-शिक्रापूर-जेजुरी-लोणंद-सातारा या राज्य मार्गावर पोवई नाका ते वाढे फाटा यादरम्यान ३.३ कि.मी. लांब मार्गाच्या दुतर्फा १ हजार ५१४ झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने बहावा, कदंब, अर्जुन, पुत्रवती, कांचन, यकृळ, पुत्राजिवा, कडूनिंब, कुंकू, मोहगणी, खडशिंग, करंज यांसारख्या औषधी व सेंद्रिय उपयोगी वृक्षांचा समावेश आहे. तसेच नगरपरिषदेच्यावतीने आयोध्यानगरी ते दत्त मंदिर, हुतात्मा स्मारक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते मोळाचा ओढा, सदरबझारमधील जेसीओ कॉलनी परिसरात सोनचाफा, ताम्हीण, बॉटल ब्रश, जांभूळ, पारिजातक, पळस, आवळा, उंबर, कुसंबी, गोरख चिंच अशा विविध प्रकारचे १ हजार २०० झाडे लावण्यात आली आहेत.

संबंधित पोस्ट

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका अभिमानास्पद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !*सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला !**गोमंतकात प्रथमच भरणार हजारो भक्तांचा कुंभमेळा !२३ देशांतील प्रतिनिधी २५ हजार भाविक  १५ पावन संतपादुका  सोमनाथ ज्योतिर्लिंग  ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन • देव, देश व धर्म जागृतीचा संदेश!

महापारेषण’ आणि ‘महानिर्मिती’मध्ये ७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पासाठी सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा- गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम

मागास भागातील समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत कार्यान्वित प्रकल्पामुळे रोजगार संधीत वाढ, समुदाय कल्याण पूरक उपक्रमात स्थानिकांचा सक्रिय सहभाग..

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta