vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्ग अनुभव’

बुद्ध पौर्णिमेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्ग अनुभव’

अमरावती, प्रतिनिधी: मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. निसर्गप्रेमींनी 24 तास घनदाट वनातील 197 मचाणींवर बसून वन्य प्राण्यांच्या हालचाली आणि दर्शनाचा रोमांचक अनुभव घेतला.

सदर उपक्रमात सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींना जेवण, नाश्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, मचाणीवर सोडणे आणि आणण्याची व्यवस्था करण्यात आली. मचाणीवर बसण्यापूर्वी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले. त्यानंतर निसर्गप्रेमींनी पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यजीवांचे निरीक्षण केले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील 3 वन्यजीव विभागात 9 वाघ, 8 बिबट, 59 अस्वल, 272 रानगवा, 409 सांबर, 125 नीलगाय प्राणी प्रत्यक्ष बघायला मिळाले. तसेच, पांढरकवडा वन्यजीव विभागात 6 वाघ, 18 अस्वल, 211 नीलगाय आणि अकोला वन्यजीव विभागात 8 बिबट, 19 अस्वल, 4 तडस व 43 नीलगाय या वन्यजीवांचे दर्शन झाले.

पूर्वी ‘प्राणीगणना’ उपक्रम आता वन्य प्राण्यांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या पद्धतींचा अवलंब केल्यामुळे ‘निसर्ग अनुभव’ हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट, गुगामल, मेळघाट वन्यजीव, तसेच अकोला व पांढरकवडा या सर्व वन्यजीव विभागांमध्ये निसर्गप्रेमींनी ऑनलाईन नोंदणी करून मचाण आरक्षित केले. या उपक्रमात मुंबई, पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, परभणी, वाशीम, बुलढाणा, अकोला, नांदेड व अमरावती तसेच मध्यप्रदेशातील निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रमात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल सहभागी निसर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक जयकुमारन, सुमंत सोलंखे, विभागीय वन अधिकारी यशवंत बहाळे, उत्तम फड, श्री. निमजे, मनोजकुमार खैरनार, स्वप्नील बांगडे, अतुल तिखे आणि आनंद विपट यांनी ‘निसर्ग अनुभव’साठी पुढाकार घेत आहे

संबंधित पोस्ट

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटीलअवकाळीमुळे नुकसान; कृषी दर्जा निकषानुसार मदत..

काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांच्या1 फेब्रुवारी 2025 पासून भाडेदरात वाढ सुरु..

vishwatmaklokswamivarta

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..!पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश सार्वजनिक अस्वछतेबाबत पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी…

भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

मांग-मातंग समाजासाठी योजनांची माहिती देणारी कार्यशाळा ११ मे रोजी 📢📚

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी