vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय लोक अदालत; ९२६ प्रकरणे तडजोडीने निकाली

राष्ट्रीय लोक अदालत; ९२६ प्रकरणे तडजोडीने निकाली

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजीत राष्ट्रीय लोकअदालत मध्ये प्रलंबित व वादपूर्व असे एकूण १२ कोटी ३६ लक्ष ९५ हजार ९५६ रुपये रकमेची ९२६ कलम १३८ एन.आय. ॲक्टची प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वै.बा.गुळवे पाटील यांनी कळविले आहे.

            जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवारी (दि.१८) करण्यात आले. त्यात विविध शासकीय विभाग, वीज कंपनी, विधीज्ञ, सरकारी वकील, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी इ. सहभाग घेतला.

 त्यात ९२६ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड झाली. त्यात प्रलंबित प्रकरणांमध्ये १२ कोटी ३६ लक्ष ९५ हजार ९५६ रुपये रक्कम वसुली झाली. राष्ट्रीय लोकअदालतीसाठी जिल्ह्यात पॅनल तयार करण्यात आले होते, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वै.बा.गुळवे पाटील यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आमदार,माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, त्या आरोपावर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे काय म्हणाले ते पहा…या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे अशी मागणी केली आणि….

vishwatmaklokswamivarta

जनसामान्यप्रेमी आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या नेतृत्वातील जनता दरबारास ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद… 

म्हाडातर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन26 सप्टेंबर रोजी लॉटरीची सोडत मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांची माहिती..

गणेशोत्सवासाठी राज्य शासनाची विशेष योजना

गडचिरोलीचे ‘चुरचुरा’ गाव १०० टक्के धूरमुक्त मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सहपालकमंत्र्यांचा मोठा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी ई-कचरा संकलन अभियानात सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta