vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी  : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन मालकांना सूचित करण्यात येते की, केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक (High Security Registration Plate HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या वाहनधारकांनी अद्याप त्यांच्या वाहनावर एचएसआरपी क्रमांक फलक बसविलेले नाहीत, त्यांनी तात्काळ अधिकृत केंद्रामार्फत एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन फलटणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांनी केले आहे.

ज्या वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेटसाठी पैसे भरलेले आहेत, त्यांच्यावर प्रत्यक्ष नंबर प्लेट बसवेपर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही. तपासणी दरम्यान केवळ एचएसआरपी नंबर प्लेटसाठीची फी भरलेली पावती दाखवली तरीही कारवाई टाळता येईल. तरी वाहनधारकांनी कोणतीही गैरसोय अथवा दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसवून घ्यावी.

0000

संबंधित पोस्ट

पीक-विशिष्ट उत्पादन कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आढावा कृषी योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांना लाभ द्यावा जिल्हाधिकारी वर्षा मीना

पैठणमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांचा जिल्हास्तरीय भव्य विक्री महोत्सव-महीला बचत गटांना एक कोटी कर्जाचे वितरण

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील अभोडा झरी गावासाठी टँकर मंजूर

कार्यालयीन गतिमानता अभियानांतर्गत दशसूत्री कार्यक्रम- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

नवउद्योगांना मंजुरी देण्यात बुलढाणा जिल्हा राज्यात चौथा तर अमरावती विभागात पहिला!Ø मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ; ३३० नवउद्योजकांनी उभारले उद्योग..

कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा उपक्रम; “डिजिटल शेती शाळा”