vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सेवा हक्‍क दिन साजरा ; सर्व ऑनलाईन सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्‍याचे निर्देश उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सेवा हक्‍क दिन साजरा ; सर्व ऑनलाईन सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्‍याचे निर्देश उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

नांदेड प्रतिनिधी- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांना पारदर्शक, गतीमान व कालबद्ध सेवा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच, आपले सरकार पोर्टल द्वारे ऑनलाइन सेवांचा लाभ सक्षमतेने देण्याचे आणि अधिसूचित सेवा वेळेत प्रदान करण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्देश दिले. सेवा हक्‍क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कै. डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन येथे लोकसेवा हक्‍क दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी डॉ. रत्‍नदिप गायकवाड, उपजिल्‍हाधिकारी अजय शिंदे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी दत्रात्र्यय गिरी, जिल्‍हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड, मनपाचे अपर आयुक्‍त गिरीश कदम, तहसिलदार विकास बिरादार, उषा इज्‍जपवार, सहायक प्रकल्‍प अधिकारी पी.बी. आडे, कौशल्‍य विकासचे एस.जे. परळीकर,नायब तहसिलदार जया अन्‍नमवार , प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक नीरज धामनगावे, समन्‍वयक कोंडीबा चोपडे आदींची उपस्थिती होती.

नागरिकांना शासकीय सेवा विहित मुदतीत, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मिळवून देण्‍यासाठी जिल्‍हाभरातील सर्व सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र पुर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील याबाबत खबरदारी घेण्‍याच्‍या सूचना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिल्‍या. ज्‍या केंद्रावरुन सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात हयगय होईल अशा केंद्रावर कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्‍हयातील उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या भूमि अभिलेख उपअधिक्षक बळवंत विठ्ठलराव मस्‍के, संतोष बिहारीलाल जगने, नायब तहसिलदार राजेश नागोराव पाठक, नंदकिशोर शंकरराव भोसीकर, ग्रामपंचायत अधिकारी रवि क्षीरसागर, दत्‍ता करपे, गोपाल टोकले, राज तोटावार व श्रीमती एस.बी.श्रीमणवार या लोकसेवकांचा जिल्‍हाधिकाऱ्याच्या हस्‍ते प्रशस्‍तीपत्र देवून गौरव करण्‍यात आला.

सेवा हक्क दिनाचे औचित्‍याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी जिल्‍हाधिकारी कार्यालयासह, पोलिस प्रशासन, जिल्‍हा परिषद, भूमी अभिलेख, कृषी, कौशल्‍य विकास, सिंचन आदी विविध विभागातील अधिकारी , कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

दुर्घटनेला जबाबदार कोण? नागरिकांचा संताप — आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारीच जबाबदार?मध्य रेल्वे मार्गावर सँन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघाताने सर्वत्र संतापाची लाट ..

vishwatmaklokswamivarta

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

जालन्यात शिवसेना महिला आघाडीचा `माझं कुकूं माझा देश’ आंदोलन

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर,बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार,बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे..

vishwatmaklokswamivarta

दहा डिसेंबर सकाळी एक वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मेगा ब्लॉक-मध्य रेल्वेने कल्याण आणि लोणावळा स्थानकांदरम्यान आवश्यक पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती आणि जतनासाठी एक विशेष अभियांत्रिकी ब्लॉक जाहीर

vishwatmaklokswamivarta