vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा!,छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हिंदुत्वनिष्ठ महिलांची घोषणाबाजी !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा!,छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हिंदुत्वनिष्ठ महिलांची घोषणाबाजी !

      राज्य प्रतिनिधी     छत्रपती संभाजीनगर – छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या या पावन भूमीत हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावला जातो, हा निधर्मी प्रशासनाचा मुजोरपणा आहे. सुरक्षा तपासणीच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा हिंदू समाज शांत बसणार नाही, असा इशारा हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी दिला.
      छत्रपती संभाजीनगर येथे ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘सीटीईटी’ (CTET) परीक्षेच्या केंद्रावर हिंदू महिलांचे पवित्र मंगळसूत्र आणि दागिने उतरवायला लावल्याच्या निषेधार्थ आज हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या हिंदूद्वेषी धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले. या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या सौ. सारिका कोलते आणि रणरागिणी शाखेच्या कु. श्रुती सिरसाट यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
  या प्रियंका लोणे म्हणाल्या की, हिंदू धर्मात मंगळसूत्र हे केवळ सौभाग्यलेणे नसून ते श्रद्धेचे प्रतीक आहे. अन्य धर्मीयांच्या धार्मिक चिन्हांच्या बाबतीत ‘धार्मिक स्वातंत्र्य’ जपणाऱ्या प्रशासनाला केवळ हिंदूंच्याच दागिन्यांमध्ये ‘मेटल’ का दिसते? हा दुजाभाव आता खपवून घेतला जाणार नाही. भारतीय संविधानाचे कलम २५ प्रत्येक नागरिकाला धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देते. परीक्षेच्या नावाखाली हिंदू महिलांची ही विटंबना संविधानाचा अपमान करणारी आहे.परीक्षा केंद्राबाहेर उघड्यावर लाखो रुपयांचे दागिने ठेवायला लावणे हा महिलांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे. जर हे दागिने चोरीला गेले असते, तर त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली असती का? असा संतप्त सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला.
       या वेळी मागण्यामध्ये दोषी केंद्र प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) हिंदूंच्या धार्मिक अलंकारांना (मंगळसूत्र, जोडवी, नथ, बिंदी) परीक्षेला बसताना मुभा असल्याचे स्पष्ट परिपत्रक काढावे. तसेच भविष्यात असा प्रकार घडल्यास तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.प्रियांका लोणे,समन्वयक, हिंदु जनजागृती समिती,छत्रपती संभाजीनगर, (संपर्क : ८२०८४४३४०१)

संबंधित पोस्ट

इतर मागास बहुजन कल्याण विभाग)विभागाच्या आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजना..

मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

भटकंती करणाऱ्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात केले दाखल*

vishwatmaklokswamivarta

सेवा भावनेतून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*अनुकंपा आणि सरळसेवा पदभरतीच्या २१० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग कार्यालयाच्या नावात बदल• ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ या नावाने पत्रव्यवहार करण्याचे आवाहन

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई