vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णसेवा अधिक गतिमान होणार

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णसेवा अधिक गतिमान होणार

मुंबई, प्रतिनिधी : सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर)उपक्रमांतर्गत मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय (सायन रुग्णालय) येथे अत्याधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे रुग्णांना जलद आणि अचूक निदान सेवा मिळणार असून उपचार प्रक्रियेलाही गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. इंडियन ऑइलसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी सीएसआर माध्यमातून आरोग्य सेवेसाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. सायन रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या या अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझरमुळे निदान प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक होईल. त्यामुळे डॉक्टरांना उपचारासंदर्भात तातडीने निर्णय घेणे शक्य होईल आणि रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळेल. लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे मुंबईसह राज्यातील विविध भागांतील हजारो रुग्णांना आरोग्य सेवा पुरविणारे महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर रक्त तपासण्या करण्यात येत असल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढत असतो.

नव्याने उपलब्ध झालेल्या या उच्च क्षमतेच्या पूर्ण स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझरमुळे तपासणी अहवाल देण्याचा कालावधी लक्षणीयरित्या कमी होणार आहे.ही अत्याधुनिक यंत्रणा मोठ्या प्रमाणात नमुन्यांची जलद प्रक्रिया करण्यास सक्षम असून त्यातून अधिक अचूक व विश्वासार्ह अहवाल उपलब्ध होणार आहेत. यामुळे रुग्णांच्या निदान प्रक्रियेला गती मिळून उपचार तातडीने सुरू करणे शक्य होईल. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहेराज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध कॉर्पोरेट संस्थांमधील सहकार्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सायन रुग्णालयात उपलब्ध झालेल्या या आधुनिक वैद्यकीय उपकरणामुळे प्रयोगशाळेची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच रुग्णांचा प्रतीक्षाकाल कमी होऊन आरोग्य सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यास मदत होणार आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पाजवळील शासकीय जमिनींवरआर्थिक केंद्र विकसित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा

जालना जिल्हा लोकअदालतीत 713 प्रकरणे निकाली;14 कोटी 33 लाखाहून अधिक तडजोड शुल्क वसूल• दोन विखुरलेले संसार पुन्हा बहरले

दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा, वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत  

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार-मुख्यमंत्री फडणवीस· आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

अंधश्रद्धा, विषमता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध सत्यशोधकांचा एल्गार — कोकण विभागीय परिषद १२ एप्रिलला नवीन पनवेलमध्ये

राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन- मंत्री अतुल सावे प्रथम विजेत्यास पाच लाखांचे बक्षीस..