vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्रातील ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमाला यशस्वी प्रतिसाद

महाराष्ट्रातील ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमाला यशस्वी प्रतिसाद

 

              रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि स्थानिक कासव मित्र यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत 2025-26 हंगामात राज्यातील 56 समुद्रकिनाऱ्यांवर एकूण 1 हजार 724 कासवांच्या घरट्यांची नोंद करण्यात आली. या घरट्यांमधील तब्बल 1 लाख 08 हजार 596 कासवांच्या पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आले असून, एकूण उबवण यशाचे प्रमाण 61.20 टक्के नोंदविण्यात आ   महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदविण्यात आली असून, त्यामधून 54 हजार 227 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53 हजार 325 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले असून, 69.95 टक्के इतके राज्यातील सर्वाधिक उबवण यशाचे प्रमाण नोंदविण्यात आले. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1 हजार 44 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.  Ĥ    यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातील आरावी, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकामळे, पूर्णगड, सालदुरे/पानंदे आणि कचरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोळी आणि कोंडुरा या समुद्रकिनाऱ्यांवर प्रथमच कासवांची घरटी नोंदविण्यात आली. यावरून महाराष्ट्राची किनारपट्टी ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांच्या प्रजननासाठी अजूनही महत्त्वपूर्ण अधिवास असल्याचे अधोरेखित होते.

        सन 2018 पासून कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या सहकार्याने मच्छीमारांसाठी नुकसानभरपाई योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मासेमारी करताना मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवांसह इतर संरक्षित समुद्री प्राण्यांना जाळे कापून जीवनदान देणाऱ्या मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यात येते. आतापर्यंत महाराष्ट्रात 486 समुद्री कासवांना वाचविण्यात मच्छीमार आणि वन विभागाला यश मिळाले असून, त्यासाठी मच्छीमारांना एकूण सुमारे 61 लाख 21 हजार 850 रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे

       त्याचप्रमाणे, समुद्री कासवे इजा किंवा संसर्गामुळे अनेकदा समुद्रकिनाऱ्यांवर जखमी अवस्थेत आढळतात. अशा कासवांची संख्या पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येते. जिवंत कासव किनाऱ्यावर वाहून आल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कांदळवन कक्षामार्फत ‘मरीन रिस्पॉन्डंट गट’ स्थापन करण्यात आला आहे. या गटात महाराष्ट्र वन विभागाचे कर्मचारी (वनपरिक्षेत्र अधिकारी), कांदळवन प्रतिष्ठानचे कर्मचारी, पशुवैद्यकीय डॉक्टर, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा समावेश आहे.

    सन 2011 पासून वाईल्डलाइफp कन्झर्व्हेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन आणि महाराष्ट्र वन विभाग (डहाणू विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणू येथे समुद्री कासवांसाठी उपचार व पुनर्वसन केंद्र चालविण्यात येत आहे. तसेच कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभाग आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने मुंबई व परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर आढळणाऱ्या जखमी कासवांच्या उपचारासाठी ऐरोली येथे कासव उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही तात्पुरती उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

 

0000000

संबंधित पोस्ट

सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

वारसा जतनाची प्रेरणा श्रीक्षेत्र मार्कंडातून…जागतिक वारसा दिनानिमित्त उपक्रम

68 लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध* *तीन दिवसात दिली जातात जन्म – मृत्यू प्रमाणपत्रे*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अलिबाग येथे भूमि अदालतचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सावकारी जाचाने पीडित कर्जदारानी योग्य त्या पूराव्यानिशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे

vishwatmaklokswamivarta

आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta