vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वच्छ नवी मुंबईसाठी धाव घेत 2200 हून अधिक महिलांनी यशस्वी केली महिला मिनी मॅरेथॉन संपन्न

स्वच्छ नवी मुंबईसाठी धाव घेत 2200 हून अधिक महिलांनी यशस्वी केली महिला मिनी मॅरेथॉन संपन्न

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने डॉ.डि वाय पाटील डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिजम स्टडिज यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महिला मिनी मॅरेथॉनमध्ये 2200 हून अधिक विविध वयोगटातील महिलांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.

चला धावूया स्वच्छ नवी मुंबईसाठी (Run for Clean Navi Mumbai)’ हा संदेश प्रसारित करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून डॉ.डि वाय पाटील डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिजम स्टडिज यांच्या वतीने कुलपती तथा अध्यक्ष डॉ.विजय पाटील यांच्या संकल्पनेतून, उपाध्यक्ष डॉ. शिवानी पाटील व डि.वाय.पाटील क्लायमेट ॲक्शन लॅबच्या प्रमुख श्रीम.राजलक्ष्मी पाटील यांच्या वतीने या मिनी महिला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई शहर स्वच्छतेच्या संदेश प्रसारणाचे ध्येय घेऊन संपन्न होणा-या या उपक्रमात महानगरपालिकेचा सहयोग मिळावा अशाप्रकारे आयोजकांमार्फत करण्यात आलेल्या विनंतीनुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची या उपक्रमास मान्यता मिळाली व अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली या उपक्रमास महानगरपालिकेने सहकार्य केले.

जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी, सायन पनवेल महामार्गा जिकच्या सर्व्हीस रोडवर असलेल्या डॉ. डि वाय पाटील स्टेडियमच्या मुख्य प्रवेशव्दारापासून या महिला मिनी मॅरेथॉनला प्रारंभ झाला. राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेत्या महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या महिला मॅरेथॉनला प्रारंभ झाला

    या महिला मिनी मॅरेथॉनचे विजेतेपद दामिनी पेडणेकर यांनी पटकाविले. तसेच व्दितीय क्रमांक प्रतिमा नसरत्ना व तृतीय क्रमांक सुजाता माने यांनी संपादन केला. 5 कि.मी. अंतराच्या ‘घे भरारी’ शिर्षकांतर्गत आयोजित या महिला मिनी मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील 2200 हून अधिक महिलांनी उत्साहाने सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला व आरोग्यपूर्ण जीवनाचे महत्वही अधोरेखीत केले.

संबंधित पोस्ट

शरद पवार असो वा फडणवीस, कोणीही ओबीसीमध्ये नवीन जात टाकू शकत नाहीत, अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार; छगन भुजबळांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

डोंबिवलीत राष्ट्रीय सुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा…

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ निमित्त २३ फेब्रुवारी रोजी सामूहिक गीत गायन -कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी होणार सहभागी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ पारितोषिक वितरण

vishwatmaklokswamivarta