
महिलांचा देशाच्या प्रगतीत व नवीन पिढी घडवण्यात, त्यांच्यापुढे आदर्शठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा : डॉ. देवेश पाथ्रीकर
बदनापूर, द प्रतिनिधी)-आज नागरी क्षेत्रात स्त्रिया अधिकारिणी बनून पुढे आल्या. शिक्षिका ते कलेक्टरपर्यंत, नगरसेविका ते पंतप्रधानापर्यंत इ. विविध क्षेत्रांत स्त्रियांनी मानाच्या जागा आपल्या कुशलतेच्यास्वबळावर पटकावल्या अन् सर्वच पदावर महिला सक्षमतेने कार्यरत आहेत.शासकीय, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रांत ३० टक्के जागा राखीव असल्यामुळेमिळालेल्या संधीचं सोनं करत कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी त्या मदत तर करतच आहेत, पण देशाच्या प्रगतीत व नवीन पिढी घडवण्यात, त्यांच्यापुढे आदर्श ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आयएएस, आयपीएस होऊन नागरी सेवा करणार्या कितीतरी स्त्रिया आपले कौशल्य देशासाठी अर्पण करीत आहेत असे प्रतिपादन निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी केले. बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्पस मध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त बदनापूर तालुक्यातील महिला अधिकारी,महिला लोकप्रतिनिधी,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, डॉक्टर आदींचा सत्कार आयोजित करण्यात आल होता, कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी डॉ. देवेश पाथ्रीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव डॉ. एम. डी. पाथ्रीकर,संस्थेचे संचालक प्रज्ञा पाथ्रीकर, डॉ. एस. एस. शेख, डॉ. खान नाजमा उपस्थित होते. बदनापूर नगराध्यक्ष वैशाली जर्हाड, उपनगर अध्यक्ष नसीम बी शेख मतीन, नगरसेवक चित्रा संतोष पवार, विद्याचल संस्थेच्या उपाध्यक्ष शोभा मदन, प्राचार्य पूजा मदन सह पाचशे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, व इतर महिला अधिकारी पद्धधिकारी आदींचा शाल, गिफ्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी बोलतांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर म्हणाले की,पूर्वी घरकाम करणे, स्वयंपाकाची कामे करणे, भाजीपाला विकणे इ. कामे करणे कमी प्रतीचं मानलं जायचं, पण सध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील शिक्षित,अशिक्षित, गरजू स्त्रिया स्वयंपाकाची कामे, मुले सांभाळणे, पाळणाघर चालवणे, मेस चालवणे, भाजी-पोळी केंद्र, हॉटेल व्यवसाय, शिवणकाम करणे,गरजू पेशंटची नर्स म्हणून शुश्रुशा करताना दिसतात. आजमितीला स्त्रिया त्यांचे सुप्त गुण हेरून विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मार्गदर्शन घेऊन तर कधी डिजिटल माध्यमांच्या यू ट्यूब, फेसबुक,इन्स्टाग्रामचा आधार घेतात व त्यांच्या बकेट लिस्टमध्ये असणार्या सुप्त इच्छांची स्वप्नपूर्ती करताना दिसतात. ज्या स्त्रिया शिक्षित आहे, परंतु काही कौटुंबिक अडचणींमुळे स्वतःच करियर करू शकल्या नाहीत, अशा स्त्रिया या संधीचं सोनं करत बुटिक टाकणं, ब्युटी पार्लर टाकणं, ऑनलाईन कपड्यांचा व्यवसाय करणे, गायनाचे क्लास घेणे, चित्रकला, डान्स, स्विमिंग, झुब्बा, योगाचे क्लास, जिम ट्रेनर, नोकरी, ऑर्गेनिक फळभाज्या विकणे, ठिकठिकाणी व्याख्यान म्हणून जाणे व जनजागृती करणे आदी कामे करताना स्त्रिया दिसून येत असून स्त्रीया कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन केले.
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने आयोजित आंतर राष्ट्रीय महिला जागतिक दिनानिमित्त बदनापूर तालुक्यातील सर्व क्षेत्रात कार्यरत महिलांना सकाळचे जेवण देखील देण्यात आले. मोठया उत्साहात सदरचा कार्यक्रम पार पडला.
००००००फोटो ओळी…..५-बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त बदनापूर तालुक्यातील महिला अधिकारी,महिला लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, डॉक्टर आदींचा सत्काराप्रसंगी बोलतांना डॉ. देवेश पाथ्रीकर.
००००००००००००००००



