vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

सेवा पंधरवडा : जळगाव जामोद तालुक्यातील महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांना लाभांचे वितरणआमदार डॉ संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती

 बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील धरती आबा योजनेत समाविष्ट असलेल्या चालठाणा व पिंपळगाव काळे या गावात महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला आमदार डॉ.संजय कुटे व जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
 शिबिराच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
शिबिरात नागरिकांना विविध योजनांचे लाभ वाटप करण्यात आले. यामध्ये ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी, ई-रेशन कार्ड, कागदपत्रांचा बटवा, विविध प्रमाणपत्रे, रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड तसेच ट्रॅक्टर वाटप आदींचा समावेश होता.
 शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच सेवा पंधरवडा अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री कार्यालय(जनसंपर्क कक्ष)महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रशासकीय मान्यता..

vishwatmaklokswamivarta

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य देणार

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पं.दिनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेण्याच्या योजनेस मुदतवाढ

सैनिक कल्याण पुणे विभागात माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक पदांची भरती…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते माणगाव येथे सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या योजना गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले• सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा..