vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अलिबाग येथे भूमि अदालतचे आयोजन

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अलिबाग येथे भूमि अदालतचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- महसूल मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार प्रलंबित अपिल प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याकामी दि.29 सप्टेंबर, दि.30 सप्टेंबर, दि.06 ऑक्टोबर व 07 ऑक्टोबर 2025 रोजी भूमि अदालत सकाळी 11.00 व दुपारी 3.00 वाजता या दोन सत्रात जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड-अलिबाग यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात, हिराकोट तळावाजवळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड-अलिबाग सुनिल इंदलकर यांनी कळविले आहे.

या तारखांमध्ये सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. सदर अपील प्रकरणांमध्ये अपिलार्थी यांनी उत्तरार्थी यांना सुनावणीच्या नोटीसा बजावण्याच्या आहेत व त्याची पोहोच सुनावणीवेळी सादर करावयाची आहे.

तसेच या तारखांना जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रायगड कार्यालयाकडून फेरचौकशीकामी पाठविण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये व तक्रार अर्जावरील प्रकरणांमध्ये तालुका स्तरावरील कार्यालयांकडूनही सुनावणी घेण्यात येणार आहे.

या भूमि अदालतीद्वारे जिल्ह्यातील प्रलंबित अपिल प्रकरणांवर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय घेण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित नागरिकांनी किंवा अपीलकर्त्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे सोबत घेऊन या तारखांना उपस्थित राहावे, जेणेकरुन प्रकरणांचा योग्य व अंतिम निपटारा करता येईल. भूमि अदालतेद्वारे तातडीने व पारदर्शक पध्दतीने प्रकरण सोडविण्याचा हेतू असून, त्यामुळे वेळेची व संसाधनांची बचत होणार आहे.

0000000

संबंधित पोस्ट

धुळे शिष्यवृत्ती प्रकरणात गुन्हा नाही; पोलिसांचा ‘बी-समरी’ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्याने केलेली अतुलनीय कामगिरी अभिमानास्पद**देशाचे खंबीर नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन ~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील लालबाग येथून लालबागचा राजा राजा गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या

vishwatmaklokswamivarta

अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आवारातील“टेरेस गार्डन”च्या निर्मिती उपक्रमाचे उद्घाटन संपन्न

राज्य एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत शासन सकारात्मक- आरोग्य राज्यमंत्री मेघना सासाकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta