vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आवारातील“टेरेस गार्डन”च्या निर्मिती उपक्रमाचे उद्घाटन संपन्न

ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आवारातील“टेरेस गार्डन”च्या निर्मिती उपक्रमाचे उद्घाटन संपन्न

ठाणे, प्रतिनिधी):- ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या आवारात “टेरेस गार्डन” उपक्रमाची निर्मिती करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक स्व.पल्लवी सरोदे यांच्या स्मरणार्थ वॉटर लिली व कमळाचे रोप लावून करण्यात आली. याचा एक पुढील टप्पा म्हणून आज निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांच्या हस्ते “टेरेस गार्डन” उपक्रमाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार सचिन चौधर, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे, वृक्षतज्ञ विजयकुमार कट्टी, आसरा फाऊंडेशनचे मोहन शिरकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ठाणे जिल्हा समन्वयक शुभम महेंद्र शिंदे, स्नेहा एन्टरटेंमेंटचे अमन कोईरी, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी व आसरा फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी श्री.कट्टी यांनी वृक्षारोपणाचे महत्व, रोपांची निगा कशी राखावी त्याचबरोबर जुन्या जीन्स पॅन्ट्सपासून विविध प्रकारच्या टिकाऊ बॅग्ज निर्मितीबाबत उपस्थितांचे प्रबोधन केले.

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल वओल्ड एज होम उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून म्हाडाच्या कामकाजाचा आढावा…

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व समता पंधरवड्यानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

पंचायत समिती कल्याण येथे कीटकनाशके हाताळणी, साठवणूक व फवारणीसाठी शेतकऱ्यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्य भोर तालुक्यातील नसरापूर तील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार  हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा….

फळपीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी..