vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पंचायत समिती कल्याण येथे कीटकनाशके हाताळणी, साठवणूक व फवारणीसाठी शेतकऱ्यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न

पंचायत समिती कल्याण येथे कीटकनाशके हाताळणी, साठवणूक व फवारणीसाठी शेतकऱ्यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे) -‌ कीटकनाशके हाताळणी, साठवणूक व फवारणी करताना शेतकऱ्यांनी‌ विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने पंचायत समिती, कल्याण येथील सभागृहात येथे दि. १४ फेब्रुवारी, २०२५ रोजी प्रशिक्षण संपन्न झाले. जिल्हा परिषदेतील कृषी विभाग व कृषी रसायन एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहयोगाने कीटकनाशक विक्रेत्यांनी शेतकऱ्यांनी कीटकनाशक हाताळणी करताना त्यांच्या घरात, शेतामध्ये, दुकानात साठवण करताना व पिकांवर फवारणी करताना कशी काळजी घ्यावी, याबाबतचे एकदिवसीय प्रशिक्षण पार पडले.

  कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे यांनी कीड व रोगाच्या प्रादुर्भावानुसार फवारणी करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत कीटकनाशक विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे, असे कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर यांनी जैविक कीटकनाशकांबाबत सविस्तर माहिती दिली. विविध प्रकारच्या अन्नधान्य भाजीपाला पिके, फळ पिकांमध्ये आढळणाऱ्या कीटकनाशकांच्या अंशाबद्दल माहिती दिली व त्यांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विक्रेते शेतीचे औषधे पेस्ट कंट्रोलसाठी विकत असतील तर अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी ताकीद दिली.

    या कार्यक्रमात कंपनीतर्फे फवारणी किटचे वाटप करण्यात आले तसेच कृषी विकास अधिकारी यांनी कंपनीने दिलेल्या सहकार्याबद्दल कंपनीचे आभार व्यक्त केले.

   या प्रशिक्षणास जिल्ह्यातील कीटकनाशक विक्रेते, शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी- कर्मचारी व कंपनीचे अधिकारी तसेच गटविकास अधिकारी संजय भोये, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारत मसाळ, डॉ. विनोद जगदाळे, मोहीम अधिकारी महेश बनकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  डॉ. विनोद जगदाळे यांनी कीटकनाशकाचे प्रकार, बुरशीनाशके, तणनाशके इत्यादींची द्रावण कसे करावे, त्यांची साठवणूक कशी करावी, फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, तसेच फवारणी करताना फवारणी किट चा वापर करण्यावर भर द्यावा, यांची सखोल माहिती दिली.

तसेच विषबाधा झाल्यावर कोणती काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मोहीम अधिकारी महेश बनकर यांनी रासायनिक कीटकनाशकाऐवजी सेंद्रिय कीटकनाशकांच्या वापरावर भर द्यावा, असे आवाहन केले. मातीतील जिवाणूंचे संवर्धन करावे, याबाबत माहिती देखील शेतकऱ्यांना देण्यात आली.

  ठाणे जिल्हा ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर ठाकरे यांनी कीटकनाशक विक्री करताना शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कीड व रोगांचे मार्गदर्शन करूनच कीटकनाशकांची फवारणी करावी, असे सांगितले. अशा प्रकारच्या कार्यशाळा तालुका तसेच गाव पातळीवर घेण्यात याव्यात, अशा प्रकारच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

  कार्यशाळेचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी दिनेश घोलप यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी बृहस्पती जावीर यांनी केले.

०००

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ,पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक विभागीय आयुक्तांकडून वृक्ष लागवड

बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद मंगळवारी- गुंतवणूकदार, उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन- सामंजस्य करार करण्याची संधी

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

बोईसर – तारापूर एमआयडीसीतील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करा – आमदार विलास तरे# स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार व ग्रामपंचायतींना मोफत पाणीपुरवठा देण्याची आग्रही भूमिका…

नक्षलवादविरोधी लढाईत एक ऐतिहासिक यश-सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सीपीआय-माओवादी सरचिटणीस बसवराजू यांच्यासह २७ माओवाद्यांना कंठस्नान घातले 

vishwatmaklokswamivarta

पहिल्याच तिमाहीत ४३४ कोटींच्या मालमत्ता कर संकलनाव्दारे नवी मुंबईने महसूल व्यवस्थापनात नोंदविला नवा इतिहास*अदायगीच्या ऑनलाइन सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डेटा विश्लेषण आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे ऐतिहासिक यश*