vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हवामान बदलाच्या परिस्थितीत शिवार फेरी चे माध्यमातून शाश्वत शेती तंत्रज्ञान जाणून घ्या कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे आवाहन

हवामान बदलाच्या परिस्थितीत शिवार फेरी चे माध्यमातून शाश्वत शेती तंत्रज्ञान जाणून घ्या कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे आवाहन

 तब्बल 25 एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी साकारणार जिवंत पिक प्रात्यक्षिके!

राज्य प्रतिनिधीजागतिक हवामान बदलाच्या परिस्थितीत “शाश्वत शेती व संपन्न शेतकरी” संकल्पना जोपासत वैश्विक पटलावर सर्वाधिक लोकसंख्यांक होऊ पाहणाऱ्या आपल्या देशातील जनतेला दोन वेळचे सकस अन्न उपलब्ध करून देण्यासाठीचे शेतकरी बंधू भगिनींना कालसुसंगत आधुनिक शेती तंत्रज्ञाना सोबतच शेती पूरक जोडधंदे, गावपातळीवर करता येणारे शेतमाल प्रक्रिया उद्योग आदी संबंधी माहिती मिळावी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा सोबतच इतरही सलग्न संस्थाद्वारे निर्मित शेती विषयक तंत्रज्ञान तथा पीक वाणांचे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष अवलोकन करता यावे तसेच अत्याधुनिक शेती तंत्र आत्मसात करीत फायद्याच्या शेतीचे अनेक अनेक पैलू प्रत्यक्ष बघता यावे व शास्त्रज्ञासोबत चर्चेद्वारे शेतीविषयक शंका समाधान करता यावे या हेतूने विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीत सहपरिवार सहभागी होत या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले आहे.

 रवीवार दिनांक 20 सप्टेंबर ते मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित शिवार फेरीचे करण्यात आले असून या तीन दिवसीय शिवार फेरीसाठी नोंदणी शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता पासून करण्यात येणार आहें. नोंदणी नंतर 20 हूनही अधिक विविध प्रक्षेत्र व संशोधन विभागाना प्रत्यक्ष भेटी देण्याची संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध झाली असून शेतकरी बांधवांचे स्वागतासाठी विद्यापीठ तत्पर असल्याचे संचालक विस्तार शिक्षण तथा आयोजक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी नमूद केले.

शिवार फेरीत सहभागी होणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींना खरीप हंगामातील जवळपास सर्व पिके व त्यांचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघता यावे या हेतूने गहू संशोधन विभागाचे प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवाना पाहण्यासाठी एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत.त्यामध्ये विविध पिकांच्या जाती लावण्यात आले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया,कडधान्य, तृनधान्य,कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांचे जाती येथे लावण्यात आलेले आहेत. तसेच विद्यापीठाचे महत्वाचे शिफारशीचे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहेत. या शिवार फेरीचे निमित्ताने शेतकरी बंधू भगिनींना आपल्या शेतीविषयक समस्यांचे तज्ञांकडून वेळीच करण्याची ही सुवर्णसंधीच उपलब्ध होणार आहे.

विदर्भासह राज्यातील सर्वच विभागातील शेतकरी बंधू भगिनींनी या शिवार फेरीचा लाभ घ्यावा व येणारा हंगाम यशस्वी करावा असे आवाहन देखील विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून  -निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..🌳 जिल्ह्यातील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

🏵️ लिव इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही : अशा जोडप्यांच्या सुरक्षिततेसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला हा निर्णय!*

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन राबविण्यावर भर – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ*मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची उपक्रम*

डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची न भरून येणारी हानी – उपसभापती सचिन अहिर