vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक बांबू दिवसानिमित्त नवी मुंबईत 1200 हून अधिक बांबू वृक्षलागवड

सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक बांबू दिवसानिमित्त नवी मुंबईत 1200 हून अधिक बांबू वृक्षलागवड

        नवी मुंबई प्रतिनिधी-  सेवा संकल्प अभियानातील ‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत जागतिक बांबू दिवसाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान ७.० मध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी बांबू वृक्ष लागवड कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वृक्षलागवडीत लोकप्रतिनिधींसह पर्यावरणप्रेमी नागरिकही उत्साहाने सहभागी झाले.

          बांबू हा जलद वाढणारा आणि पर्यावरणाला भरपूर प्राणवायू देणारा वृक्ष असल्याने नवी मुंबईतील हरित क्षेत्राचा पर्यावरणपूरक विकास होण्याच्या दृष्टीने ही विशेष मोहीम राबविण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्राधान्याने देशी वृक्षलागवड करण्याचे महापालिकेने निश्चित केले असून त्यास अनुसरून विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहीमा मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जागतिक बांबू दिवसाचे औचित्य साधून 18 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकस्पनेतील ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत बांबू वृक्ष लागवडीची मोठी मोहीम हाती घेण्यात आली.

          उद्यान विभागाच्या उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे यांच्या नियंत्रणाखाली 8 विभागात राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपण मोहीमांमध्ये विद्यार्थी, नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह पाणीपुरवठा समिती सभापती श्री.रविकांत पाटील, नगरसेविका ॲड.भारती पाटील, नगरसेवक श्री.डी. आर. पाटील, नगरसेविका श्रीम.दिक्षा कचरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वच ठिकाणी संबंधित कार्यालयाचे विभाग अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता उपस्थित होते. विशेषत्वाने संत निरंकारी संस्था कोपरखैरणे या सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी व सदस्यही या मोहीमेत सहभागी झाले होते.

यावेळी –      बेलापूर: सेक्टर ८ डॅम परिसर – २५ बांबू झाडे       नेरुळ: सायकल ट्रॅक, सेक्टर १९ – २५ बांबू झाडे  सानपाडा: ट्री बेल्ट, सेक्टर ३० – ३५ बांबू झाडे वाशी: एपीजे अब्दुल कलाम उद्यान, सेक्टर १० – २२ बांबू झाडे कोपरखैरणे: शांतिदूत महावीर उद्यान, सेक्टर २३ – ३८० बांबू झाडे  घणसोली: भूखंड क्रमांक २७, सेक्टर १५ – २५ बांबू झाडे       ऐरोली: स्मशानभूमी परिसर, सेक्टर २० – ६० बांबू झाडे  दिघा: बालमित्र साने गुरुजी उद्यान – १५ बांबू झाडे     अशा आठ विभागांतील मुख्य ठिकाणी तसेच इतर विविध ठिकाणी मिळून एकूण 1200 हून अधिक बांबू वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये लोकप्रतिनिधींनी नागरिकांसह सहभागी होत वृक्षारोपणातून पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रसारित केला. सेवा संकल्प अभियानामध्ये महापौर श्रीम.सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांमध्ये उद्यान विभागामार्फत अशा प्रकारचे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या संख्येने हाती घेण्यात येत आहेत.

 

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 23.03 टी.एम.सी. पाणीसाठा

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित ; राज्याचे दरडोई उत्पन्न ३.४७ लाखांवर’ ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2025-26’ सादर • देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा• देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के वाट्यासह राज्य अग्रस्थानी• स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७ टक्के ,नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वाढत असून राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर• ६३.८५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगार निर्माण*

जमीन महसूल वसुलीसह फेरफार प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया-विविध विकासकामांची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासकामांची जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

एलपीजीचा अवैध साठा, काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची जिल्हा नियंत्रण कक्षास भेट-आपत्तीच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता तात्काळ उपाययोजना राबवा- उपमुख्यमंत्रीआपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा- उपमुख्यमंत्री