vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे शहरातून पर्यावरण संवर्धनासाठी ठाण्याच्या महाराजाचा आशीर्वाद घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत संगम प्रतिष्ठान चा पर्यावरण पुरक जनजागृती सुरू 

*ठाणे शहरातून पर्यावरण संवर्धनासाठी ठाण्याच्या महाराजाचा आशीर्वाद घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत संगम प्रतिष्ठान चा पर्यावरण पुरक जनजागृती सुरू

मुंबई प्रतिनिधी

संगम प्रतिष्ठान, कोकाकोला वेबरेजेस, एन एस एस विद्यार्थ्यांच्या सह ठाण्याचा महाराजाच्या पदाधिकाऱ्यांच्या साथीने आणि ठाणेकरांच्या साक्षीने किसन नगर, पडवळनगर परिसरातील *मानाचा गणपती ठाण्याचा महाराजा** याच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त उपरोक्त संस्थेच्या सहकार्याने संगम प्रतिष्ठान ने पुढाकार घेऊन शिवसेनेच्या नवनिर्वाचित **आनंदयात्री पर्यावरण सेनेच्या* साथीने स्थानिक आमदार श्री. रवींद्र फाटक यांच्या शुभेच्छा सह शेकडो स्वयंसेवकांसह स्वच्छता मार्च आणि पेट कलेक्शन ड्राईव्ह राबवून पर्यावरण पुरक गणेशोत्सव व पेट बॉटल रिसायकल साठी जनजागृती अभियान ठाणे शहरात दणक्यात आणि लोकसहभागात सुरू झाले.

**शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी शिंदे आणि शिवसेना युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात आनंदयात्री पर्यावरण सेना येत्या सहा महिन्यात ठाण्यातून सुरू झालेले हे पर्यावरणीय वादळ संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना नेते आणि सैनिकांसह तुफान आणेल आणि पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्त शहरं करण्यासाठी पूर्णवेळ कार्यरत राहील अशी ग्वाही अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रीमान तानाजी घाग यांनी केले**

या चळवळीला मोठ्या प्रमाणात यश मिळत असून मुंबई महानगरीत बांद्रा एच.पश्चिम विभागात **माऊंट मेरे चर्च परिसरात* स्वच्छतेबाबत जनजागृती आणि पेट कलेक्शन ड्राईव्ह,तसेच चकाचक मुंबई हे पथनाट्य सादर करून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.यावेळी एच विभागातील मनपा अधिकारी/ कर्मचारी तसेच कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासह पालकमंत्री श्री.आशिष शेलार साहेब स्वतः उपस्थित राहू शकले नसले तरी भाजपचे पदाधिकारी **श्री.मनी बालन टीम सहित उपस्थित होते.सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता श्री.परशुराम कुऱ्हाडे यांनी ही चळवळ लोकाभिमुख व्हावी असे आवाहन केले*.गणेश विसर्जनापर्यंत मुंबईतील लालबाग,परळ,माटुंगा,दादर,माहीम,धारावी सह जास्तीत जास्त ठिकाणी जनजागृतीचे काम चालूच राहील.

*या पर्यावरणीय चळवळीत सहभागी सन्मानितांचे संगम प्रतिष्ठानच्या सचिव अँडवोकेट कोमल तानाजी घाग तसेच संचालक रवींद्रलाल नाडर यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले,व पुढील कार्यासाठीबसहार्य मिळावे असे आवाहन केले**या कार्यक्रमाला वेळे अभावे उपस्थित राहू शकले नसले तरी *पालकमंत्री श्रीमान आशिष शेलारजी यांनी संगम प्रतिष्ठानच्या या मोहिमेस शुभेच्छा तर दिल्याच, पण शिवसेनेच्या नवीन पर्यावरण विषयक सेल आनंदयात्री पर्यावरण सेनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. तानाजी घाग यांचेही अभिनंदन केले** आणि ही चळवळ लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासना तर्फे महानगरपालिकेकडे शिफारस करण्याची भ्रमणध्वनी वरून ग्वाही दिली.

संबंधित पोस्ट

आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याची गरज;आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अशासकीय विधेयक सभागृहाच्या पटलावर विचारार्थ बदलत्या सामाजिक परिस्थितीत पालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विधेयक पालकांच्या पालन-पोषणाला कायदेशीर बळ देण्याचा आ.मुनगंटीवार यांचा पुढाकार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी एक हजार पंधरा तरुणांनी उभारले स्वतःचे उद्योग…

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचा राज्यस्तरावर गौरव

जिल्हा परिषद, ठाणे येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

ठाणे महानगरपालिके चे आवाहन शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही..

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष हेतू कंपनीस भाडेपट्टा कराराच्या मुद्रांक शुल्कात सवलत…