vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी*

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी*

        *बुलढाणा प्रतिनिधी* केंद्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत अतिरिक्त गॅस जोडण्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा उज्वला समितीही स्थापन करण्यात आले असून प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना विस्तारीत-2 व 3 मध्ये आतापर्यंत 16 हजार 177 लाभार्थ्यांना जोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत विस्तारीत योजना 1 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील, 1 लाख 89 हजार 347 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार देशात विस्तारीत-2 मध्ये 75 लाख तर विस्तारीत-3 मध्ये 25 लाख असे एकूण 1 कोटी अतिरिक्त गॅस जोडण्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विस्तारीत-2 मध्ये 8 हजार 694 लाभार्थी तर विस्तारीत-3 मध्ये 7 हजार 483 लाभार्थी असे एकूण 16 हजार 177 लाभार्थ्यांना जोडणी देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारे LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच पारंपरिक इंधनाचा वापर कमी करणे, महिलांचे व कुटुंबाचे आरोग्य सुधारणा, धूरमुक्त स्वयंपाकघर निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे हेही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ही योजना केवळ गॅस कनेक्शनपुरती मर्यादित नसून महिलांच्या सशक्तीकरणाचा एक प्रभावी सामाजिक उपक्रम आहे.

000000

संबंधित पोस्ट

शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई-उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश …

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ यशस्वी करूया- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई,महोत्सवात नेत्रदीपक लेझर शो, टेंट सिंटी, पर्यटकांसाठी साहसी खेळ,विविध परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..

हर घर तिरंगा’ मोहीमेंतर्गत लोकसहभागातून होणार विविध उपक्रमांचे आयोजन

सातारा जिल्ह्यातील युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या निवास्थानाचा स्मारकापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासास दिल्ली येथे* *होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिलेला उजाळा**गोष्‍ट बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाची….*

vishwatmaklokswamivarta

श्री रामाच्या जयघोषासह मंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा संपन्न सिंहस्थ कुंभमेळा २०२७ यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक-गिरीश महाजन

गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस