vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा…

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा…

राज्य प्रतिनिधी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट २०२६’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा करण्यात आली आहे. या झोनमध्ये महाराष्ट्र, गोवा आणि पुदुच्चेरीचा समावेश आहे. ही दोन दिवसीय अंतिम फेरी १२ व १३ एप्रिल २०२६ दरम्यान नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे होणार आहे. अशी माहिती माय युवा भारत महाराष्ट्र व गोवाचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माय युवा भारत मुंबईचे उपसंचालक अनुप इंगोले उपस्थित होते

यामध्ये देशभरातून राष्ट्रीय स्पर्धेतून निवड झालेले उत्कृष्ट युवा सहभागी एकत्र येणार आहेत. शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विषयविशेषज्ज्ञ यामध्ये सहभागी होऊन केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ शी निगडित विषयांवर चर्चा करतील. देशभरातील १७ ठिकाणांहून १५,००० हून अधिक युवक या संवादात सहभागी होणार आहेत. देशभरातून १२ लाखांहून अधिक युवकांनी सहभाग नोंदवला असून ४६,५०० पेक्षा अधिक निबंध प्राप्त झाले आहेत. ‘नारी शक्तीः विकसित भारत की आवाज’ या विषयावर आधारित महिला युवा संसद हा कार्यक्रमाचा विशेष भाग असेल. या सत्रात महिला सहभागी महिला आरक्षण विधेयकावर संसदीय पद्धतीने चर्चा करतील. पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी १२ एप्रिलच्या सायंकाळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने ‘संडे ऑन सायकल’ हा उपक्रम नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम येथे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती पुंडे यांनी यावेळी दिली.

२ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. विशेषतः विकसित भारत युवा लीडर्स डायलॉगमधून आलेल्या अनेक कल्पनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला असून, यामुळे धोरणनिर्मितीत युवांना केंद्रस्थानी ठेवण्याच्या सरकारच्या बांधिलकीला अधोरेखित केल्याचेही पुंडे यांनी सांगितले.

 

संबंधित पोस्ट

खो-खो महिला-पुरुष संघाने विश्व चषक जिंकला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी खेळाडूंचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरक्षेचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पथकाकडून आढावा!

करवंड येथे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी गुणवंताबाई विवाह सोहळा उत्साहात संपन्न;किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी – राज्य निवडणूक आयुक्त

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध – महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे,बचतगट, सुरक्षा, कौशल्य विकास व सायबर साक्षरतेवर भर

पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,गृहराज्यमंत्र्यांचा पोलीस कुटुंबीयांशी संवाद

vishwatmaklokswamivarta