vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अग्निशमन केंद्र, कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अग्निशमन केंद्र, कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण

सांगली, प्रतिनिधी : शासन व महानगरपालिका निधीतून माळबंगला सांगली येथे बांधण्यात आलेले अग्निशमन केंद्र 24 तास सुरू राहणार आहे. महानगरपालिका क्षेत्र, नजिकच्या माधवनगर ग्रामपंचायतीच्या मोठ्या असलेल्या बाजारपेठेत तसेच शेजारील ग्रामीण भागात आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी हे अग्निशमन केंद्र अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र अग्नि सुरक्षा अभियानांतर्गत माधवनगर रोड, माळबंगला सांगली येथे अग्निशमन केंद्राचे लोकार्पण, अग्निशमनासाठी अत्याधुनिक वाहने तसेच दीनदयाळ जन आजीविका योजनेंतर्गत महानगरपालिकेस प्राप्त 9 कचरा संकलन इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, उपायुक्त स्मृती पाटील, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

शासन निर्णय 25 फेब्रुवारी 2025 अन्वये अग्निशमन व आपत्कालिन सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्नि सुरक्षा अभियानांतर्गत 70 टक्के शासन निधी व 30 टक्के महापालिका निधी नुसार 4 कोटी 95 लाख रूपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी शासन हिस्साचे 70 टक्के 3 कोटी 46 लाख 50 हजार रूपयांपैकी पहिला टप्पा हा 2 कोटी 50 लक्ष रूपये इतका निधी महापालिकेस प्राप्त झाला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सांगली शहरातील माधवनगर रोड येथे माळबंगला जल शुध्दीकरण केंद्र येथे अग्निशमन केंद्र (FS-/II) टाईप व सांगली मधील हनुमाननगर मनपा एसटीपी जवळ अग्रिशमन केंद्र (FS-/III) बांधण्याकरिता तसेच, नवीन चार अग्निशमन वाहने खरेदी करण्यासाठी या निधीचा विनियोग करण्यात येत आहे. अग्निशमन केंद्र कामांतर्गत अग्निशमन विभागाचे कार्यालय, नियंत्रण कक्ष, वर्कशॉप स्टोअर, कर्मचारी यांचेसाठी निवासस्थान, पार्किंग यांचा समावेश आहे. यातील अग्निशमन विभागाचे कार्यालय, नियंत्रण कक्षाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण आज करण्यात आले. तसेच, अग्निशमन विभागाकडे वाहने दाखल झालेली आहेत. FS-/II प्रकारच्या अग्निशमन केंद्रात तीन अग्रिशमन वाहने व दोन जीप असे स्वरुप आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे आणि सचिन सागावकर, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, महेश मदने, ऋतुराज यादव आदि उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनलवर,योजना, निर्णयांची अचूक, अधिकृत माहिती मिळणार…

vishwatmaklokswamivarta

घरो घरी तिरंगा- हर घर तिरंगा ,तिरंगा कॅनव्हाच्या माध्यमातून देशभक्तीचा गौरव नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद पनवेल महानगरपालिकेमार्फत अभिनव उपक्रम..

राज्यातील आयकॉनिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यावरती पर्यटन विभागाने भर द्यावा,पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

🚩 २१ नोव्हेंबर 🚩**महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन,संयुक्त महाराष्ट्र साठी ज्या १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता बलिदान केले त्या सर्वांना विनम्र अभिवादन !

vishwatmaklokswamivarta

स्वीप उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हस्तकला, रांगोळी प्रदर्शनातून दिला मतदानाचा संदेश…

18 विधानसभा मतदारसंघातील 12 विधानसभा मतदारसंघातून गेल्या तीन दिवसात 746 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदान-85 वर्षांवरील 651 ज्येष्ठ नागरिक, तर 95 दिव्यांग मतदारांनी केले गृहमतदान

vishwatmaklokswamivarta