vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

जालना, (प्रतिनिधी )-राज्यातील कलंकित व वादग्रस्त मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी जालना जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवार रोजी जालना शहरातील महात्मा गांधी चमन येथे आक्रोश व धरणे आंदोलन आयोजित केले. यावेळी शिवसैनिक व पदाधिकार्‍यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत मंत्र्यांच्या राजीनामेची मागणीकेली.

यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, जिल्हा संघटक भानुदासघुगे,उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, जयप्रकाशचव्हाण, प्रदीप बोराडे, पंडित गावडे, शहरप्रमुख बाला परदेशी, दुदुर्गेशlकाठोटीवाले, दीपक रणनवरे, भारत पंडित, गंगुताई वानखेडे, बाबुराव कायंदे यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री बेजबाबदारपणे वागून वादग्रस्त विधाने करीत आहेत. तर अनेकांचे भ्रष्टाचार उघडकीस आले आहेत. तरीही त्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या गृहमंत्र्यांची डान्सबार बंद करण्याची जबाबदारी आहे तेच डान्सबार चालवत आहेत, कृषी मंत्री शेतकर्‍यांची हेटाळणी करीत आहेत, समाज कल्याण मंत्री समाजाच्या ऐवजी स्वतःचे कल्याण करण्यातच मग्न आहेत, एकीकडे राज्यात अंधश्रद्धे विरोधातील कायदा असताना राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीच सत्तेसाठी जादूटोणा करत आहेत हे अत्यंत दुर्दैवीचित्र राज्यात दिसत आहे. या राज्याला अत्यंत उच्च दर्जाच्या व सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे.अत्यंत छोट्या छोट्या आरोपांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख,ए.आर.अंतुले, शिवाजीराव निलंगेकर, तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील याव्यक्तींना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मनोहर जोशी मुख्यमंत्रीअसताना तत्कालीन मंत्र्यांवर आरोप झाल्याने त्यांनाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पदावरून काढले होते. परंतु आज मात्र अनेक  आरोप होऊनही मंत्र्यांचा राजीनामा होत नाही. त्यांचा राजीनामा घेतला जात नाही.

यातून सरकारची हतबलता दिसून येते. अशा भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे न

झाल्यास हे मंत्री असेच निर्ढावल्यासारखे वागतील. करिता आता जनतेनेच याबाबत विचार करून त्यांना धडा शिकवणे गरजेचे असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, जिल्हासंघटक भानुदास घुगे, तालुकाप्रमुख प्रदीप बोराडे, यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी युवासेना शहरप्रमुख दर्शन चौधरी, किशोर नरवडे पंडित क्षीरसागर, जनार्दन गिराम, सुरेश वाघमारे, सखावत पठाण, ऋषिकेश खिरे, अनंता वैद्य,सखाराम घोलप, प्रभाकर उगले, जनार्दन गिराम, सुरेश वाघमारे, विजयबोरुडे,योगेश जाधव, अजय रोडीये, विठ्ठल पाऊलबुद्धे, जीवन खंडागळे, सोनाजी खांडेभराड, राज इंगळे, संतोष क्षत्रिय, गणेश लाहोटी, मदन खरात, पांडुरंगकाळे, प्रभाकर ब्राह्मणे, अभिमन्यू खापरे, रजनीश कणके, बाळासाहेब गावडे,जनार्दन रेगुडे, सुनील चौधरी, किरण तुम्मा, तुकाराम भुतेकर, विजय बोरुडे,बळीभाऊ खैरे, बाबासाहेब खांडेभराड, सचिन चव्हाण, दिगंबर बोरुडे, प्रभाकर शिंदे, सर्जेराव कायंदे, मच्छिंद्र शेळके, संदीप राठोड, श्याम चव्हाण,परमेश्वर खैरे, सतीश डूम, अनिल दहिजे, गणेश दराडे, बाळाभाऊ सदावर्ते, राजेंद्र कोटेचा, अनिस पठाण, सादिक मिर्झा, गणेश तरासे, शेख राहील, वसीम पठाण, अब्दुल नईम, गजानन गिराम, सचिन नागरे, कैलास मिसाळ, सादिक मीर्झा,राहिल भाई, सुनील तोडकर, नितिन गुमरे, शेख ईमताज, शेख नईम, अजय रोडिया,सादिक मिर्झा, राहील मणियार, नितीन गमरे, सुनील तोडकर, शेख इम्तियाजआदींची यावेळी उपस्थिती होती.

०००००००००००००फोटो ओळी…..१२- राज्यातील कलंकित व वादग्रस्त मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यामागणीसाठी जालना जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जालन्यात आक्रोश व धरणे आंदोलन करण्यात आले.

संबंधित पोस्ट

आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिकांचे आवाहन; 30 जानेवारीपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

नागपूर, कोराडी येथील माविमअंतर्गत प्रकल्प तातडीने सुरू करण्याचेमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश· नागपूर कोराडी प्रकल्पामुळे हजारो महिलांना रोजगार उपलब्ध होणार…

करियर निवडीसाठी मानसशास्त्रीय मार्गदर्शन कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर येथे कुणबी प्रमाणपत्र संदर्भातील महत्त्वपूर्ण जिल्हानिहाय आढावा बैठक संपन्न…

कार्यालयीन गतिमानता अभियानांतर्गत दशसूत्री कार्यक्रम- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta