vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे अ‍ॅड.भास्कर मगरे यांच्या आंदोलनाला यश-अभिमन्यू खोतकर दलित आदिवासी भूमिहीन कासकारांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार- दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे अ‍ॅड.भास्कर मगरे यांच्या आंदोलनाला यश-अभिमन्यू खोतकर दलित आदिवासी भूमिहीन कासकारांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार- दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

जालना, (प्रतिनिधी)- महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांच्या भुमिहिन, कास्तकर, आदिवासी यांच्यासाठी करण्यात आलेल्याआंदोलनाला यश आले असल्याचे युवासेनेचे अभिमन्यु खोतकर यांनी सांगितले.शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जालना तालुकास्तरीय दलित आदिवासी भूमिहीन कास्तकार मेळावा ११ ऑगस्ट रोजी घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी मेळाव्याचे उद्घाटक युवा सेना म.रा.सचिव अभिमन्यू खोतकर, दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे, अण्णासाहेब बाळराज, जय खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी अभिमन्यू खोतकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री

चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील दलित आदिवासी भूमिहीन शेतजमिनी नावे करून सातबारा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जालना जिल्ह्यात शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी गेले अनेक वर्षापासून जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष केला आहे. त्या संघर्षालाआज यश आलेले आहे. अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की, शिवसेना दलित आघाडी गेली अनेक वर्षापासून जनआंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष करत आहे हे आंदोलन कायदेशीर मार्गाने असल्यामुळे आतापर्यंत या आंदोलनात लाभार्थ्यांची संख्या वाढत गेली.शासन निर्णय २८ नोव्हेंबर १९९१ अधिनियमानुसार १ एप्रिल १९७८ ते १४ एप्रिल१९९० या दरम्यान महाराष्ट्रातील दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांचेशेतीसाठी झालेले अतिक्रमण नियमानुकुलित करून त्यांना सातबारा देण्यातयावा असे शासनाचे आदेश असताना प्रशासकीय स्तरावर आतापर्यंत या शासननिर्णयाची अंमलबजावणी होत नव्हती आणि म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून जीभूमिका मांडली त्या भूमिकेला आज रोजी यश आलेलं आहे. कारण महसूल मंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी जो राज्यातील दलित आदिवासी भूमिहीनकास्तकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला आहे. जालना जिल्ह्यातीलदलित आदिवासी भूमिहीन कासकारांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. शिवसेनादलित आघाडीच्या जालना तालुकास्तरीय मेळाव्यास जालना ग्रामीण भागातूनमोठ्या संख्येने दलित आदिवासी भूमीन कास्तकारांची उपस्थिती होती.

०००००००फोटो ओळी…..शिवसेना दलित आघाडीच्या दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांच्या जालना येथेआयोजित मेळाव्यात बोलतांना अभिमन्यु खोतकर यांच्यासह दलित आघाडीचेजिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे.

संबंधित पोस्ट

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शिवशाही पुनर्वसन’ प्रकल्पाला बळकटी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लागवडीखालील पोटखराब जमिनीची नोंद ॲग्रिस्टॅक योजनेत होणार !कोणतीही बाधा नाही ; शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करुन घ्यावाजिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगरसाठी मोठा निर्णय – साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी ₹१,२३४ कोटींच्या तरतुदीस मान्यता..

समाधान समारोह 2026 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत 21, 22 व 23 ऑगस्टला- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम- सहभागासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करा – आमदार विलास तरे

औद्योगिक व उन्नत कौशल्य विकासासाठी NIELIT संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 नि:शुल्क प्रशिक्षण कार्यक्रम