vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समाधान समारोह 2026 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत 21, 22 व 23 ऑगस्टला- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम- सहभागासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026

समाधान समारोह 2026 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत 21, 22 व 23 ऑगस्टला- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम- सहभागासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026

        सांगली, प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या वतीने “समाधान समारोह 2026” अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत दि. 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित केली आहे. या विशेष लोकअदालतीचा मुख्य उद्देश सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा संमती आधारित निराकरण प्रक्रियेव्दारे सलोख्याने निपटारा करणे हा आहे. यामध्ये वकील, पक्षकार आणि संबंधित हितधारकांनी सक्रिय सहभाग घेऊन वादांचे प्रभावी निवारण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

       न्यायप्रकियेत सहभाग आणि न्याय आपल्या दारी या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने “समाधान समारोह” या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाची सुरुवात दि. 21 एप्रिल 2026 पासून झाली असून, दि. 21 ते 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोकअदालतीमध्ये त्याचा समारोप होणार आहे.

      यामध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पध्दतीने (ऑनलाईन) उपस्थित राहू शकतात. यामध्ये सहभागासाठी पक्षकार आणि त्यांचे वकील https://forms.gle/jqxefqF4BCWzukoP6 या गुगल लिंकव्दारे अर्ज करू शकतात. तसेच https://www.sci.gov.in या संकेतस्थळावर देखील अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026 असून अधिक माहितीकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – माण-खटाव तालुकास्तरीय कार्यशाळेचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 3 नगर परिषदांमध्ये 68 जागांसाठी 92 हजार 864 मतदार*

vishwatmaklokswamivarta

बालकांच्या आधारवरील बायोमेट्रीक अद्यावतीकरणासाठी मोहीम

सर्व यंत्रणांनी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली कार्यान्वित करावी : कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta