vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून आधार कार्ड वापरण्यात यावा -शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून आधार कार्ड वापरण्यात यावा -शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जालना, प्रतिनिधी)- १२ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीबाबत पुनर्विचार करुन आधार कार्ड वापरण्यात यावा नसता शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,इशाराही जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात शिवेसना जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव,

जिल्हाप्रमुख महेश नळगे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुखभगवान कदम, हनुमान धांडे,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम रमेश घुगे,शहरप्रमुख दिपक रननवरे, महेश पुरोहित, अनिस पठाण, दिनेश काकडे,सुरेशराणा, परमेश्वर मात्रे, अंकुशराव वाघ, फेजान मिर्झा यांच्यासह मोठ्यासंख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होतशिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत महिलांसाठी प्रवास सवलतीसाठी स्मार्ट,कार्ड योजना राबविण्यात येत आहे. ही योजना स्तुत्य असली तरी १२ ते ६५वयोगटातील सर्व महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्याबाबत काहीव्यावहारिक अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना,स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया व,केंद्रांपर्यंत पोहोचणे हे अनेकदा कठीण ठरते. तसेच, तांत्रिक अडचणी,नेटवर्क समस्या आणि कार्ड हटवणे/बिघडणे यामुळे प्रवासात अडथळे निर्माणहोतात. अनेक महिला दैनंदिन मजुरी करणार्‍या असल्याने त्यांना वेळ काढणेही कठीण जाते.१२ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायीव्यवस्था उपलब्ध करून आधार कार्ड वापरण्यात यावा. ओळखपत्राच्या आधारेसवलतीचा लाभ मिळण्याची सुविधा सुरु ठेवावी. ग्रामीण भागात अधिक नोंदणीकेंद्रे व सोपी प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी. तांत्रिक अडचणी दूर,करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. आपण या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन महिलांना सोयीस्कर व सुलभ अशी व्यवस्था उपलब्ध करून द्याल,अशी अपेक्षा आहे.

महिलांकडे आधार कार्ड असल्याकारणाने त्यांना महिला असल्याचा पुरावा हाग्राह्य धरण्यात यावा. नाहक महिलांकडून २०० ते २५० रुपये वसूल करण्यातयेऊ नये.याबाबत सहानुभूती पूर्वक विचार करावा नसता शिवसेनेच्या वतीनेतीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवरराहील, असा इशाराही निवेदनाव्दारे दिला आहे

संबंधित पोस्ट

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा : महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

संचालक माहिती कार्यालयाचे शेषराव पवार सेवानिवृत्त..

अमली पदार्थ विरोधी जनप्रबोधनासाठी गीत स्पर्धा, 51 हजाराचे बक्षीस- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta