vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान;गांधेली येथे वृक्ष लागवड कामांची पाहणी

महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान;गांधेली येथे वृक्ष लागवड कामांची पाहणी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- गांधेली ग्रामपंचायत अंतर्गत साई टेकडी परिसरात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (MVSTF) मार्फत केलेल्या एक लक्ष ४५ हजार वृक्ष लागवड व जलसंधारण उपक्रमांची पाहणी आज (दि.५) करण्यात आली. गट विकास अधिकारी श्रीमती मिना रावतळे यांनी ही पाहणी केली.

 या अंतर्गत साई टेकडी परिसरात वृक्ष लागवड, रोपांची गुणवत्ता, वाढ व दीर्घकालीन टिकाव, सिंचन, संरक्षण व नियमित देखभाल व्यवस्था, जलसंधारणाची विविध कामे व त्यांचा भूजलस्तरावर होणारा सकारात्मक परिणाम, ग्रामपंचायत गांधेली व स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग यासह उपक्रमाच्या नियोजन, अंमलबजावणी व प्रत्यक्ष परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या उपक्रमामुळे साई टेकडी परिसरात हरित आच्छादनात लक्षणीय वाढ, पर्यावरणीय संतुलन, तसेच पर्यटन स्थळाच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडत आहे. वृक्षलागवड आणि जलसंधारणाचा समन्वय हा शाश्वत पर्यावरणीय व पर्यटन विकासाचा आदर्श नमुना ठरत आहे. जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (MVSTF) व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पर्यावरण संवर्धन, जलसुरक्षा, जैवविविधता संरक्षण आणि स्थानिक विकास य्चे दृष्य परिणाम दिसत आहेत.पाहणी दरम्यान कृषी अधिकारी दिनकर जाधव, विस्तार अधिकारी सोळशे, सरपंच मन्नू शेख, ग्रामपंचायत अधिकारी सलोनी खरात, अभियान सहयोगी दयानंद माने, जिल्हा कार्यक्रम समन्वयक किरण बिलोरे, प्रकल्प समन्वयक सतीश खंदारे, अमोल कुटे, रवी वाघमोडे, जलदूत महेश तळेकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध; रासायनिक खतांचा तुटवडा नाही तक्रारींसाठी तालुका, जिल्हास्तरीय कृषी कार्यालयाकडे संपर्क साधावा

विधानपरिषद कामकाज/नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा-अमरावती ‘एमआयडीसी’साठी सकारात्मक निर्णय घेणार – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अनुकंपा नियुक्ती* *गरजू कुटुंबांच्या घरात एका क्षणात परतला आनंद*

सातारा जिल्ह्यात रोजगाराची संधी: मेळाव्यांतून ७७६ तरुणांना दिलासा;मुख्यमंत्री युवा कार्य’ योजनेचाही मोठा टप्पा

vishwatmaklokswamivarta