vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त भव्य प्रभात फेरी

नांदेड, प्रतिनिधी. ११ एप्रिल : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आज ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड यांच्या वतीने स्व. वसंतराव नाईक चौक ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.

या प्रभात फेरीत शासकीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच महाविद्यालयीन सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून तसेच शैक्षणिक संदेशपर कविता सादर करून सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश दिला.

यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले प्रमुख उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना द्विशताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच समग्र वाङ्मय ग्रंथ भेट म्हणून प्रदान केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी नांदेड जिल्ह्याचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
००००००

संबंधित पोस्ट

दि.02 डिसेंबर रोजी आठवडा बाजार पूर्णवेळ राहणार बंद जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला बंदी आदेश

vishwatmaklokswamivarta

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद-सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta

चौथे विश्व मराठी संमेलन मराठीचा शुद्ध, सक्षम आणि प्रभावी वापरासाठी माध्यमांचा नेहमीच पुढाकार -मराठी परिसंवादातील सूर

नव्या मुंबईत दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वा. पर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta