vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रविवारी 1 फेब्रुवारी 2026  रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक .

 

रविवारी 1 फेब्रुवारी 2026  रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक .

[ मुंबई प्रतिनिधी: रविवार म्हटलं की, आरामाचा किंवा घरच्या कामाचा दिवस. अशावेळी मुंबईकर अनेकदा रविवारी घराबाहेर पडतात. पण या दिवशी मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ शकते. अशावेळी रविवारी घरातून बाहेर पडताना मेगाब्लॉकचे टाईम टेबल पाहूनच निघावे लागणार आहे. रविवारी 1 फेब्रुवारी 2026  रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत असण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

कसा असेल रविवारचा मेगाब्लॉक

रविवारी मेगाब्लॉक हा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर असणार आहे. या मेगाब्लॉकचा कालावधी सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक सुरु राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 09.34 ते दुपारी 3.3 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद /अर्ध-जलद लोकल फेऱ्यांना ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहेत.

या लोकल फेऱ्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील, तसेच सुमारे 10 मिनिटे उशिरा पोहोचतील. कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.40 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद/ अर्ध-जलद लोकल फेऱ्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील.

या फेऱ्या त्यांच्या नियोजित थांब्या व्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकात अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.या लोकल फेऱ्या सुमारे 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.

मेल एक्सप्रेसचा कसं असेल टाईम टेबल?छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल- एक्सप्रेस गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान ५ व्या मार्गिकेवरून वळविण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि दादर येथे येणाऱ्या अप मेल-एक्सप्रेस गाड्या कल्याण ते ठाणे -विक्रोळी दरम्यान 6 व्या मार्गावरून वळविण्यात येतील.

हार्बर मार्गावरील वाहतूक,मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. मुंबई,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यान वाशी-बेलापूर -पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या तसेच पनवेल-बेलापूर -वाशी येथून सकाळी 10.17. ते दुपारी 3.47 वा. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला तसेच पनवेल-वाशी भागात विशेष उपनगरीय लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ठाणे-वाशी आणि नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानपरिषद सभापती यांच्या दालनाचे उद्घाटन

जालना जिल्ह्यात 25 ते 27 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी-  विजेच्या कडकडाटासह 25 ते 27 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता-नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे

आनंदवन येथील बाबा आमटे यांच्या संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून3 कोटी 8 लाखांचा निधी…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ‘एनएसएस’च्या 12 स्वयंसेवकांचा-कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव

vishwatmaklokswamivarta

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

vishwatmaklokswamivarta

ग्रामपंचायतींमध्ये आपले सेवा केंद्र सुरू करा* जिल्हाधिकारी संतोष पाटील*