vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना संकल्पपत्राव्दारे मतदानाचे आवाहन

नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना संकल्पपत्राव्दारे मतदानाचे आवाहन

 

        नवी मुंबई प्रतिनिधी  15 जानेवारी 2026 रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा याकरिता महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निवडणूक विषयक ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

          अशाच प्रकारचा *‘मतदान संकल्पपत्र’ हा एक अभिनव उपक्रम ‘आमचा संकल्प 100 टक्के मतदानाचा’ या शिर्षकांतर्गत नवी मुंबईतील शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.52 दिघा मध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात हा मतदानाचा संकल्पपत्र उपक्रम यशस्वी केला. यापुढील काळात महानगरपालिकेच्या तसेच खाजगी अशा सर्वच शाळांमध्ये संकल्पपत्राचा हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.*

          दोन भागांमध्ये विभागलेल्या या संकल्पपत्राचा सुरुवातीचा भाग ‘प्रिय आई बाबा..’ या संबोधनाने सुरु होत असून विद्यार्थी आपल्या पालकांना संकल्पपत्रातून आवाहन करीत आहेत की, “माझे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तुम्ही दिवस-रात्र परिश्रम करत आहात. माझे भविष्य देशाच्या मजबूत लोकशाहीशी जोडलेले आहे. यासाठी मी तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये गुरुवार दि.15 जानेवारी 2026 रोजी तुमचे अनमोल मत द्यायला जरुर जायचे आहे, असा संकल्प करायला लावणार आहे. मला विश्वास आहे की तुम्ही हा संकल्प निश्चित पूर्ण करणार.” अशा मजकुराखाली प्रत्येक विद्यार्थी त्याचे संपूर्ण नाव, इयत्ता व शाळेचे नाव लिहील.

          संकल्पपत्राच्या त्याखालील भागात ‘आई-वडीलांचा संकल्प’ हा स्वतंत्र भाग ठेवण्यात आला असून त्यामध्ये, “आम्ही शपथ घेतो की, भारतीय घटनेने आम्हाला दिलेल्या मतदानाच्या अमूल्य अधिकाराचा कोणत्याही परिस्थितीत वापर करुन मतदान करु तसेच आमच्या कुटूंबातील सदस्यांना व परिचित व्यक्तींनाही मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करु. तसेच आम्ही कोणत्याही भितीपोटी, लालसेपोटी, मतदान करणार नाही. तसेच धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्याची जबाबदारी पार पाडू” अशा संकल्पाचा उल्लेख केलेला आहे.

          शाळेतील विद्यार्थी हे संकल्पपत्र वाचून व सही करुन घरी नेतील आणि त्यावर खालील भागात असलेल्या आई-वडीलांचा संकल्प यामध्ये त्यांच्या सही व नावासह मतदान करणार असे संकल्पपत्र भरुन घेतील.

          विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना मतदानाचे महत्व सांगणारा संकल्पपत्राचा आगळावेगळा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनातही लहान वयातच मतदानाचे महत्व रुजवणारा आहे. त्यामुळे हे विद्यार्थी 18 वर्षाचे होतील आणि मतदानास पात्र ठरतील तेव्हा नक्कीच मतदान करतील. त्यामुळे 100 टक्के मतदानाचा संकल्प प्रसारित करणारा हा आगळावेगळा उपक्रम विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांना मतदानाचे आवाहन करणारा आहे.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार

राज्य शासनाच्या सेवा नागरिकांना व्हॉट्सॲपवरही उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे येथे गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनाचा समारोप

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित तेवीस जिल्ह्यातील ३३ लाखापेक्षा जास्त्‍ शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटीची मदत वितरणास मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील• मागील सात दिवसात सुमारे पाच हजार कोटींवर मदत• यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सात हजार ५०० कोटीची मदत…

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात 25 ते 27 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी-  विजेच्या कडकडाटासह 25 ते 27 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता-नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta