vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापे येथे देशी वृक्षरोपांची लागवड

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापे येथे देशी वृक्षरोपांची लागवड

 

        नवी मुंबई प्रतिनिधी – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे.  अशाच प्रकारचा एक अभिनव उपक्रम महापे येथे नमुंमपा परिमंडळ 2 विभागाच्या वतीने जीवन विद्या मिशन या संस्थेच्या सहयोगाने आयोजित करण्यात येऊन 90 देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.
  नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर पडावी यादृष्टीने देशी वृक्षारोपांची लागवड करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून त्यानुसार महापे येथे आंबा, वड, पिंपळ, फणस, लिंब अशा 90 देशी वृक्षारोपांची लागवड करण्यात आली. त्यासोबत 10 सुगंधी पुष्परोपांची लागवडही करण्यात आली.
  परिमंडळ 2 विभागाचे उपायुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या पुढाकारातून, कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.भरत धांडे व उद्यान सहाय्यक श्री.श्रीकांत जाधव यांच्या माध्यमातून, जीवन विद्या मिशन संस्थेच्या सहयोगाने हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. याप्रसंगी जीवन विद्या मिशनचे स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त वैचारिक अभिवादन

पुरी’ गावच्या महिला बचत गटांची पंढरीची वाटघोंगटा उत्पादनातून आर्थिक कमाई आणि पुण्य संचितही

एसआयआर कामासाठी शनिवार व रविवारी बीएलओ भेटीसाठी मतदान केंद्र क्षेत्रात विशेष कॅम्प

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ प्रदर्शनाची नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी- प्रदर्शनातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहितीप्रद स्टॉलला अनेक विकासक व नागरिकांची भेट

vishwatmaklokswamivarta

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती