vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

एसआयआर कामासाठी शनिवार व रविवारी बीएलओ भेटीसाठी मतदान केंद्र क्षेत्रात विशेष कॅम्प

एसआयआर कामासाठी शनिवार व रविवारी बीएलओ भेटीसाठी मतदान केंद्र क्षेत्रात विशेष कॅम्प

        नवी मुंबई प्रतिनिधी-  ‘कोणतीही पात्र व्यक्ती मतदार यादीतून वगळली जाणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश असणार नाही’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अर्थात एसआयआर सुरू आहे. या अंतर्गत 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत या कामासाठी नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेमार्फत प्रत्येक नोंदीत मतदारापर्यंत दोन प्रतींमध्ये गणनापत्र (Enumeration Form) घरोघरी पोहचविण्यास सुरूवात झालेली आहे. आपल्या मतदार यादी भाग क्रमांकाचे बीएलओ कोण आहेत याची माहिती 150 ऐरोली करिता https://www.facebook.com/share/p/1DWA4rSkHv/ या लिंकवर तसेच 151 बेलापूर करिता https://www.facebook.com/share/p/19FVzXaDvf/ या लिंकवर उपलब्ध आहे.

          सदर गणनापत्रामध्ये माहिती भरून व स्वाक्षरी करून एक प्रत मतदारांनी बीएलओ यांचेकडे परत द्यायची आहे व दुसरी प्रत बीएलओची स्वाक्षरी घेऊन पोहोच म्हणून आपल्याकडे ठेवायची आहे. हे काम राष्ट्रीय महत्वाचे असून याव्दारे योग्य मतदारांचीच नावे मतदारयादीत राहिल्याने मतदार यादी शुध्द होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने यामध्ये राष्ट्रीय जबाबदारी समजून सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी केले आहे.

          यामध्ये नागरिकांना अधिक सुलभता यावी यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेमार्फत शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी बीएलओ यांना एका ठराविक ठिकाणी उपस्थित ठेवून विशेष कॅम्प आयोजित करण्याचे राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार मतदान केंद्राची ठिकाणे तसेच काही विशेष कॅम्पची ठिकाणे, जेथे बीएलओ उपलब्ध असणार आहेत अशा कॅम्पच्या स्थळांची यादी 150 ऐरोली करिता https://www.facebook.com/share/p/1Bfe5CktY8/ तसेच 151 बेलापूर करिता https://www.facebook.com/share/p/17jfzFuWJu/ या लिंकवर नागरिकांना सहज उपलब्ध असून नागरिक आपल्या मतदार यादीतील भाग क्रमांकानुसार बीएलओ यांची त्या ठिकाणी भेट घेऊन आपली एसआयआर गणनापत्र (Enumeration Form) भरणेची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतात अशी माहिती 150 ऐरोली मतदार नोंदणी अधिकारी श्रीम.प्रिती पाटील व 151 बेलापूर मतदार नोंदणी अधिकारी श्रीम.अश्विनी पाटील यांचे वतीने देण्यात आलेली आहे.

          तरी नागरिकांनी दि. 25 जुलै (शनिवार) व दि. 26 जुलै (रविवार) 2026 रोजी आपल्या मतदान केंद्राच्या व कॅम्पच्या ठिकाणी एसआयआर गणनापत्र (Enumeration Form) भरणेच्या कार्यवाहीसाठी उपस्थित असणा-या बीएलओ यांची भेट घेऊन ही प्रक्रिया करून घ्यावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत नागरिकांना घरपोच शासकीय सेवा – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे८० विभागांच्या तब्बल ४०२ सेवा आता नागरिकांच्या दारी

vishwatmaklokswamivarta

परभणीतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर जलसंधारण व सिंचन क्षमतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 1 लाख 16 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द

महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी संजय मिसाळ 

कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005

vishwatmaklokswamivarta