vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुरी’ गावच्या महिला बचत गटांची पंढरीची वाटघोंगटा उत्पादनातून आर्थिक कमाई आणि पुण्य संचितही

पुरी’ गावच्या महिला बचत गटांची पंढरीची वाटघोंगटा उत्पादनातून आर्थिक कमाई आणि पुण्य संचितही

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- पुरी ता. गंगापूर येथील महिलांनी तयार केलेल्या प्लास्टीकच्या घोंगट्या आता तयार झाल्या आहेत. त्या आता आळंदी ते पंढरपूर या वारीच्या मार्गावर विक्रीसाठी उपलब्ध होतील. व्यवसायाच्या निमित्ताने पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून रक्षण करुन या महिलांनी पांडुरंग सेवेची अनोखी वाट शोधली आहे.

पुरी गावातील महिला ह्या महिला आर्थिक विकास महामंडळांच्या माध्यमातून बचत गटांमध्ये संघटीत झाल्या. आणि त्यांनी प्लास्टीक पासून घोंगट्या (पावसापासून रक्षण करणारे पारंपारिक प्रावरण) बनविण्याचा आणि त्या विकण्याचा व्यवसाय सुरु केला. सन २००७ पासून त्या हा व्यवसाय करीत आहेत. १४ बचत गटांच्या माध्यमातून ५० ते ६० महिला या व्यवसायाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यापैकी एक रागिणी महिला बचत गट. सुनिता वसंत गिरी ह्या या गटाच्या अध्यक्ष आहेत.

असा असतो कच्चा माल-विविध उत्पादनांच्या पॅकींगसाठी प्रिंटेड प्लास्टीक पेपर वापरला जातो. हा पेपर आतून कोटींग असलेला असतो. त्याच्या वरच्या भागात उत्पादनाशी संबंधित माहिती छापलेली असते. त्यातील छपाईत काहीतरी दोष असल्याने कंपन्यांकडून हा कागद रद्दबातल केलेला असतो. हा १५० ते २०० जीएसएम कागद ह्या महिला विकत घेतात. हाच त्यांचा कच्चा माल. हा माल बहुदा मुंबई किंवा गुजरातहून येतो. ५० रुपये किलो या दराने घेतलेल्या एक किलो कच्च्या मालापासून ५ घोंगट्या तयार होतात. त्या किमान ५० ते ६० रुपये प्रति घोंगटी या दराने वारकऱ्यांना विकल्या जातात.वारकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या घोंगट्या

वारकऱ्यांन्या पारंपारिक गोणपाट अथवा घोंगडी (मेंढीच्या लोकरीपासून बनवलेली) पासून बनवलेल्या घोगट्यांऐवजी ही घोंगटा अधिक योग्य वाटते. कारण ही वजनाला हलकी असते. त्यामुळे डॊक्यावर घेऊन चालत जाणे सहज शक्य होते. वारकऱ्यांसोबत असलेली थैलीही त्यात सहज सांभाळली जाते. शिवाय पाऊस उघडल्यावर सहज घडी करुन थैलीत बाळगता येते. रात्री झोपतांना अंथरुणासाठीही वापरता येते.

शिलाई ते सिलींग-आधी ह्या महिला घोंगटा शिलाई मशिनवर शिवत असत. आता त्यांनी सिलिंग मशिन आणली आहे. त्याद्वारे घोंगटीची दोन टोके यंत्रावर चिकटवली जातात. त्यामुळे उत्पादनाचा वेग वाढला आहे. यंदा ह्या महिलांनी ८ टन कागद मागवला आहे. घोंगट्यांसोबत त्या याच कागदाची ताडपत्रीही बनवतात. ही ताडपत्री शेतकरी वर्ग आपल्या शेतीमालाला झाकून ठेवण्यासाठी वापरतात. आतापर्यंत ४ टन कागदाची ताडपत्री यंदा विक्री झाली सुद्धा. आता लवकरच घोंगट्या विक्रीसाठी आळंदीकडे रवाना होतील. काही व्यापारी सुद्धा हा माल विकत घेऊन जातात.

माविमंची भुमिका,दरवेळी ह्या महिला माविमकडून अर्थसहाय्य घेतात आणि त्याद्वारे कच्चा माल खरेदी करतात. त्यातून घोंगट्या तयार करुन दरवर्षी त्या विक्रीसाठी नेतात आणि नफा कमावून त्यातून कर्ज फेड करतात. आतापर्यंत २० लाख रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले आहे. त्याची त्या नियमित फेड करत असतात. दरवर्षी त्यांना ५० टक्के रक्कम नफा म्हणून शिल्लक राहते. वारीच्या कालावधीतच विक्री होत असल्याने चार महिने आधीपासून ते कामाला लागतात. वारीचा महिनाभर विक्री करुन आपल्या घरी परततात. पदरी असतो नफा आणि वारकऱ्यांची पर्यायाने पांडुरंगाची सेवा केल्याचे संचित.

०००००

संबंधित पोस्ट

बुलढाणा जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ वारसांना सातबारावर नोंदणी करण्याची संधी १ ते ३१ मार्चपर्यंत कालबध्द कार्यक्रम चिखली तहसीलचा उपक्रम जिल्हास्तरावर

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा देण्यासाठी लोकचळवळ आवश्यक- गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन· गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध· अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने· राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही· समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई· अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावासाठी टँकर मंजूर

पुणे येथील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह  राज्यातील २२ जिल्ह्यांतून १ हजारांहून अधिक मंदिर विश्वस्तांची शासनाकडे जोरदार मागणी देवस्थानांच्या भूमींचे रक्षण करण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट राज्यात तात्काळ लागू करा !

vishwatmaklokswamivarta