vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2027:मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2027:मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात

अमरावती, प्रतिनिधी: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षा 2027 च्या पूर्व तयारीसाठी उमेदवारांना विनामूल्य प्रशिक्षण भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी राज्यस्तरावर सामायिक प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून यासाठी नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 जून 2026 ही राहील, तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी 19 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या प्रवेशासाठीची राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा दिनांक 19 जुलै 2026 रोजी रविवारी, सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत संपूर्ण राज्यात ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेची सविस्तर जाहिरात, आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची संपूर्ण माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व महत्त्वाच्या सूचना www.siac.org.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक डॉ. प्रतिभा भोरजार यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील गोरगरीबांसाठी पक्की घरे हेच ध्येय – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पात्र व्यक्तींना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा शाळेतील माजी विद्यार्थिनी पश्चिम विभागाची कर्णधार फुटबॉलपटू राबिया शेख यांचा आयुक्तांनी केला विशेष सत्कार…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशी राज्य शासनाची भूमिका असून राज्य शासन एसटी कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी नागरिकांनी विविध विषयांवर आपले मत द्याव